IAS Swapnil Naik: गोव्याच्या सुपुत्राचा अरूणाचल प्रदेशमध्ये गौरव

उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदकासह राज्यपाल पुरस्कार प्रदान
IAS Swapnil Naik
IAS Swapnil NaikDainik Gomantak
Published on
Updated on

IAS Swapnil Naik: ‘आग्मूत’ केडरचे गोव्याचे आयएएस अधिकारी स्वप्निल नाईक यांचा मंगळवारी अरूणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्ट.जनरल के. टी. पटनाईक यांच्या हस्ते राज्यपाल पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

IAS Swapnil Naik
CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या भेटीला...

अरूणाचल प्रदेशच्या घटक राज्यदिनी या राज्यासाठी ग्रीन फिल्ड विमानतळ उभारण्याचे महत्वपूर्ण काम केल्याबद्दल त्यांना सुवर्णपदक देण्यात आले आहे. या समारंभाला मुख्यमंत्री प्रेम खंडू, उपमुख्यमंत्री चौना मेन व मुख्य सचिव श्री धर्मेंद्र उपस्थित होते. नाईक यांनी विमानतळ विक्रमी वेळेत पूर्ण केला आहे.

व्यवसायाने सिव्हील इंजिनियर असलेले स्वप्निल नाईक गोव्यातून आयएएस बनले असून आपल्या प्रामाणिक सेवेसाठी ते प्रसिध्द आहेत.आपल्या तीन वर्षांच्या अरूणाचल प्रदेशमधील सेवेत नागरी विमान वाहतूक वस्त्रोद्योग आणि हातमाग अशी खाती सांभाळत असून तेथील प्रशासकीय सेवेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा मान त्यांना जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com