'भाजपच्याच उमेदवारीवर निवडणूक लढवणार'

कुडचडेचे आमदार आणि वीजमंत्री निलेश काब्राल यांचं स्पष्टीकरण
Nilesh Cabral

Nilesh Cabral

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव : गोव्यात येऊ घातलेले सरकार हे भाजपचेच असणार असा विश्वास कुडचडेचे आमदार आणि वीजमंत्री निलेश काब्राल यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणूक जर पक्षाने उमेदवारी दिल्यास भाजपवरच लढणार, हे काब्राल यांनी स्पष्ट केलं आहे.

<div class="paragraphs"><p>Nilesh Cabral</p></div>
गडकरींनी दाखवला गोव्याच्या विकासाचा रोडमॅप

काब्राल आगामी निवडणूक काँग्रेसकडून लढवू शकतात, अशी शंका कुडचडे येथे व्यक्त केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर काब्राल यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतरांप्रमाणे माझी भाजप पक्षात घुसमट होत नाही, असे निलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी सांगितले.

भाजपमुळे (BJP) मला राजकारणात प्रवेश मिळाला. भाजपनेच मला वेगवेगळी पदे देऊन मोठे केले. येणारे सरकार आमचेच ही काळ्या दगडावरची रेख आहे. त्यामुळे काही जण पक्ष सोडून दुसरीकडे का धावतात ते कळत नाही, असेही ते म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Nilesh Cabral</p></div>
माझी नाराजी विशेष बैठकीनंतर पुर्णपणे दुर झाली: मायकल लोबो

भाजप यावेळी 12 आमदारांना (MLA) पुन्हा उमेदवारी देणार नाही, असे सांगितले जाते त्याबद्दल मत काय विचारले असता, तो निर्णय पक्ष घेणार आहे. पक्षाने सर्वेक्षण केले आहे. त्यात लोकांना कोण पाहिजे आणि कोण नको आहेत ते त्यांना माहीत आहे. लोकांना जर एखादा आमदार नको असल्यास त्याची तिकीट जाऊ शकते. मला तिकीट मिळणार की नाही हेही मला ठाऊक नाही असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com