Vishwajit Rane : गावोगावी उत्सवांना प्रोत्साहन देणार : विश्वजीत राणे

उस्ते सत्तरीत श्रीराम मंदिराच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रतिपादन
Vishwajit Rane In Ram Temple Uste
Vishwajit Rane In Ram Temple UsteDainik Gomantak

सत्तरी तालुक्यात सर्वांगीण विकास करतानाच आपले सण, उत्सव, गावागावातील धार्मिक परंपरा यादेखील जीवनातील अविभाज्य घटक आहे. गावात अनेक प्रकारची मंदिरे आहेत. ती गावची शान बनून आहेत. गावातील मंदिर हे लोकांना एकत्र आणण्याचे माध्यम आहे.

रस्ते, वीज, पाणी या बरोबरच मंदिरे देखील महत्वाचा घटक असल्याने ग्रामीण भागातील धार्मिक उत्सव, सण, वर्धापन दिनालाही विशेष प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले आहे.

Vishwajit Rane In Ram Temple Uste
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट रोज 6 तासांसाठी राहणार बंद

उस्ते सत्तरी येथील श्रीराम मंदिराच्या ९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात रविवारी राणे बोलत होते. श्री.राम मंदिर सेवा समितीतर्फे आयोजीत कार्यक्रमाला नगरगाव पंचायतीच्या सरपंच संध्या खाडीलकर, उपसरपंच रामू खरवत, पंच देवयानी गावकर, पंच मामू खरवत, देवस्थानचे अध्यक्ष बारकेलो राणे, सावळो उस्तेकर, पांडुरंग गावकर आदींची उपस्थिती होती.

संध्या खाडीलकर म्हणाल्या, उस्ते गावात नैसर्गिक वातावरणात श्रीराम मंदिर लोकांनी उभे केले होते. अशा प्रसन्नमयी परिसरात लोकांनी अवश्य भेट द्यावी.

उपसरपंच रामू खरवत यांनी विचार मांडले. पांडुरंग गावकर यांनी सूत्रनिवेदन व आभार मानले. राणेंनी श्रीराम मंदिरात जाऊन प्रभूंचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी निसर्गरम्य परिसरात तासभर थांबून आल्हादायक वातावरणाचा आस्वाद घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com