...म्हणून गोव्यात हायब्रिड फेरीबोट लांबणीवर

मोटर आणि तंत्रज्ञ इटलीतून येण्यास विलंब लागत असल्याने लोकार्पणासाठी उशीर
ferry boat
ferry boat Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील पहिल्या सोलर हायब्रिड फेरीबोटसाठी गोमंतकीयांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. फेरीबोटचं व्यावसायिक तत्वावर लोकार्पण काही कारणांमुळे लांबणीवर पडल्याची माहिती आहे. कोरोना परिस्थितीमुळे बोटीच्या काही पार्ट्सची जोडणी शिल्लक असल्याचं समोर आलं आहे.

ferry boat
Goa Election 2022: आमदारांच्या जोडणीसाठी आतापासूनच लॉबिंग सुरू

या बोटची चाचणी काही दिवसांपूर्वीच बंदरकप्तान विभागाकडून झाली होती, मात्र या बोटीसाठी लागणारी इलेक्ट्रिक मोटर इटलीहून मागवण्यात आली होती. राज्यात कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केल्यामुळे बोटीसाठी लागणारी मोटर आणि अन्य उपकरणं येण्यास विलंब झाला आहे. बोटीमध्ये ही मोटर आणि अन्य उपकरणं न बसवल्यामुळे हायब्रिड फेरीबोट प्रवाशांच्या सेवेत येण्यास उशीर होत आहे.

फेरीबोटमध्ये ही मोटर जोडण्यासाठी इटलीहून इंजिनिअर आणि तंत्रज्ञ गोव्यात येणार होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ते एप्रिल महिन्यापर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच ही मोटरही इटलीहून येणार असल्याने फेरीबोटच्या प्रत्यक्ष कार्यरत होण्यास विलंब लागणार आहे. ही इलेक्ट्रिक कम सोलर फेरीबोट दिवारमधील अॅक्वेरीअस शिपयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनच मोटर इटलीतून (Italy) मागवण्यात आली आहे. 2018 मध्ये गोव्यातील पथकाने केरळमध्ये जात अशा प्रकारच्या फेरीबोटची पाहणी केली होती. त्यानंतर गोव्यात (Goa) प्रायोगिक तत्वावर अशी फेरीबोट आणण्याचा विचार सुरु करण्यात आला होता.

ferry boat
वास्कोत आजपासून कार्निव्हल उत्सव

इटलीहून मागवलेली ही मोटर पूर्णपणे इलेक्ट्रिक असून गोव्यातील पहिलीच मोटर असेल जी फेरीबोटमध्ये बसवण्यात येईल. तसंच याची बॅटरी चार्ज होण्यासही खूप वेळ लागतो. त्यामुळे सोलर (Solar) हायब्रिड फेरी चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सध्या जरी या फेरीसाठी विलंब होत असला तरीही यापुढे फेरीसाठी लागणारे पार्ट साठवून ठेवले जाणार आहेत. ज्यामुळे पुन्हा काही अडचण आल्यास इटलीतील इंजिनिअर्सवर विसंबून न राहता इथल्या इथे दुरुस्ती केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com