Reservation
ReservationDainik Gomantak

ST Reservation: एसटी आरक्षणासाठी आजपासून उपोषण

ST Reservation: राज्यातील अनुसूचित जमातीसाठीच्या (एसटी) राजकीय आरक्षणाची अधिसूचना केंद्र सरकारने पुढील 48 तासांत जारी न केल्याने ठरल्यानुसार पणजीतील आझाद मैदानावर उद्या 6 मार्चपासून उपोषण करण्यात येणार आहे.
Published on

ST Reservation:

राज्यातील अनुसूचित जमातीसाठीच्या (एसटी) राजकीय आरक्षणाची अधिसूचना केंद्र सरकारने पुढील 48 तासांत जारी न केल्याने ठरल्यानुसार पणजीतील आझाद मैदानावर उद्या 6 मार्चपासून उपोषण करण्यात येणार आहे.

संध्याकाळी नेत्यांची बैठक होऊन उपोषणाची पुढील रूपरेषा ठरविली जाणार असल्याची माहिती ‘मिशन पॉलिटिकल फॉर एसटी रिझर्व्हेशन’ संघटनेचे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी दिली.

अनुसूचित जमातीचे नेते व आमदारांचे शिष्टमंडळ गृहमंत्री अमित शहा यांना भेटले, तेव्हा त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात एसटी आरक्षणाच्या अधिसूचनेबाबत चर्चा करून ठराव घेण्याचे आश्‍वासन एसटी आरक्षणासाठी आजपासून उपोषण दिले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक होऊनही आरक्षणाचा मुद्दा चर्चेस आला नाही.

Reservation
Goa Accident Death: धारगळ येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

गेल्या दोन दिवसांपूर्वी पुन्हा मंत्रिमंडळ बैठक झाली त्यामध्येही तो आला नाही. यावरून केंद्र सरकार एसटी आरक्षण देण्यासंदर्भात गंभीर नसून झुलवत ठेवण्याचा प्रयत्न सुरूच आहे. एसटी आरक्षण अधिसूचना काढण्यास गेल्या रविवारी (४ मार्च) केंद्र सरकारला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता, त्याची मुदत संपल्याने उद्याचे उपोषण ठरल्यानुसार सुरू केले जाणार आहे.

‘केंद्र व राज्य सरकारवर विश्‍वास ठेवा’

राजकीय आरक्षणाबाबत अनुसूचित जमाती (एसटी) समाजाने केंद्र व राज्य सरकारवर विश्‍वास ठेवावा. त्यांना दिलेल्या आश्‍वासनानुसार केंद्र सरकार निश्‍चितच फेररचना आयोग नेमण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com