Goa Cashew Farmers: दमट वातावरण ‘काजू’ला मारक! उत्पन्न घटले, दराला फटका; सत्तरीतील बागायतदार चिंताग्रस्त

Goa Cashew Farmers: आधीच वन्यप्रण्यांचा त्रास आणि आता या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Goa Cashew Farmers
Goa Cashew FarmersDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cashew Farmers

सत्तरी तालुक्यात यावर्षी काजू पीक अत्यंत कमी आहे. त्यातच आता गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यभरात दमट आणि ढगाळ वातावरण बनले आहे. दमट हवामानामुळे उत्पन्न आणखीन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच वन्यप्रण्यांचा त्रास आणि आता या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळच्या वेळेला पावसाची शक्यता दिसून येत आहे. आता एप्रिल महिना सुरू झाला तरीही काजूच्या झाडावर नवीन बोंडू फळ धरलेले दिसून येत नाही. काजूच्या फांद्यांना केवळ पानेच दिसून येतात. बागायतदारांनी आपल्या व्यथा सरकार दरबारी मांडल्या आहेत.

धावे येथील चंद्रकांत गावकर म्हणाले, गतवर्षी आठ क्लिंटल काजू बिया मिळाल्या होत्या. सेंद्रिय प्रमाणीकरण असलेल्या या काजू बिया गोवा बागायतदार सोसायटीत वाळपई शाखेत विक्री केल्या होत्या. सेंद्रिय काजूंना सोसायटी जास्त दर देते तसेच कृषी खात्यातर्फेदेखील आधारभूत किंमत मिळाली होती. पण यावर्षी उत्पन्नच घटल्याने मोठा फटका बसला आहे.

Goa Cashew Farmers
AAP On Goa CM: 'आप' नेते कोणालाच घाबरलेले नाहीत, मुख्यमंत्र्यांना 'भिवपाची गरज आसा'

बोंडूच्या रसात घट

धावे येथील चंद्रकांत गावकर म्हणाले, दरवर्षी दररोजचा पंधरा लिटरप्रमाणे दहा डब्यांचा बोंडू रस मिळत असे. यावर्षी केवळ कसाबसा एक डबा बोंडूचा रस मिळत आहे. बागायतीत आपले कुटुंब काम करते; पण उत्पन्नच अत्यंत कमी मिळत असल्याने मोठे नुकसान होणार आहे. काजू बियांना दरही अल्प आहे.

काजूंना मोहोरच नाही

कुडशे येथील बागायतदार बाबाजी राणे म्हणाले, दरवर्षी चार-साडेचारशे किलो काजू बियांचे उत्पादन मिळत होते. पण यावर्षी शंभर किलो होणेदेखील कठीण बनले आहे. एप्रिल महिन्यात वार्षिक काजू पिकांचे मोठे उत्पादन मिळत होते. यावर्षी काजूच्या झाडांना मोहरच धरलेला नाही. दमट हवामानाचा व एकंदरीत बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून काजू उत्पन्न घटले आहे.

- पद्माकर केळकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com