Goa News: शिरोडा ग्रामसभेत प्रचंड वाद; फोंडा पोलिसांत तक्रारी दाखल

Goa News: चित्रीकरणावरून वाद : माईक, बाटल्‍या फेकून मारल्‍या
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: शिरोडा पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत भाजपपुरस्कृत पंचायत मंडळ व रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍सचे (आरजी) कार्यकर्ते यांच्‍यात प्रचंड राडा झाला. आरोप-प्रत्यारोपानंतर दोन्ही गटांकडून फोंडा पोलिसांत परस्‍परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्‍या आहेत.

Goa Police
Ranji Trophy Cricket Tournament: सुमार कामगिरीमुळेच गोवा पराभवाच्या द्वारी

‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी ग्रामसभेचे चित्रीकरण सुरू केले. त्यास पंचसदस्य मेघनाथ शिरोडकर यांनी आक्षेप घेतला आणि वादाला सुरूवात झाली.

तक्रारदार ‘आरजी’ कार्यकर्त्या दीपंती शिरोडकर यांच्‍या म्हणण्यानुसार, ग्रामसभेत प्रश्‍‍न मांडून चित्रीकरण करू नये असे कुठेच म्हटलेले नाही. शिवाय आक्षेप सरपंचाने घ्यायला हवा होता, पंचसदस्याने नव्हे. जाब विचारल्यानंतर पंच मेघनाथ नाईक व सुहास नाईक यांनी माझ्‍या अंगावर धाव घेत असभ्य भाषेत गैरशब्द वापरले, हात पिरगळला, विनयभंग केला आणि धमकीही दिली. ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.

या उलट सरपंच पल्लवी ऊर्फ मुग्धा शिरोडकर यांनी सांगितले की, ग्रामसभेत पंचायतीतर्फे चित्रीकरण सुरू असतानाही ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरण सुरू ठेवले म्हणून जाब विचारला.

Goa Police
Col. C.K. Nayudu Trophy: गोव्याच्या युवक संघाची धुलाई करत 'आंध्र'ची 404 धावांची कमाई

त्यावेळी तक्रारदार महिलेने पंचसदस्यांच्या अंगावर धाव घेत पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या. तसेच ध्वनिक्षेपकाची मोडतोड केली व अर्वाच्य शब्द वापरले. या मोडतोडीत सुमारे पंचवीस हजारांचे नुकसान झाले. वास्तविक आम्ही वेळोवेळी या लोकांना ग्रामसभेचे चित्रीकरण पुरविले आहे. असे असताना मुद्दामहून चित्रीकरण का? असा सवाल सरपंचांनी केला.

आमदार वीरेश बोरकर यांची पोलिसांत धाव

या हाणामारी प्रकरणाची त्वरित दखल घेत आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी फोंड्यात धाव घेतली. तसेच कार्यकर्त्यांसह पोलिसांत तक्रार दाखल केली. भाजपची ही दादागिरी असून लोकांना आवाज उठवायला प्रतिबंध केला जात आहे. पंचायतमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

ही लोकशाही की ठोकशाही? असा सवाल करून असे प्रकार चालत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा बोरकर यांनी दिला. दरम्यान, ‘आरजी’चे एक कार्यकर्ते विश्‍वेश नाईक यांनी असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही असे सांगतानाच पोलिसांनी ग्रामसभेवेळी बघ्याची भूमिका घेतली असा आरोप केला.

परस्‍परविरोधी तक्रारी दाखल

असभ्य वर्तन केल्याप्रकरणी मेघनाथ शिरोडकर व सुहास नाईक या दोघांविरोधात ‘आरजी’च्‍या दीपंती शिरोडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर, ग्रामसभेत हुल्लडबाजी केल्याप्रकरणी दीपंती शिरोडकर, सोनाली नाईक, शैलेश नाईक, विपुल नाईक व धनराज नाईक यांच्याविरोधात सरपंच पल्लवी ऊर्फ मुग्धा शिरोडकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com