New Delhi: केजरीवाल राजीनामा द्या! दिल्लीत BJP आक्रमक, गोवा निवडणुकीत मद्य घोटाळ्याचा पैसा वापरल्याचा आरोप

‘ईडी’च्या दाव्यानुसार ‘आप’च्या सर्वेक्षण टीममध्ये सहभागी असलेल्या गोव्यातील कार्यकर्त्यांना सुमारे 70 लाख रुपये रोख दिले गेले.
New Delhi
New DelhiDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी नवा दावा केला आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीतील मद्य घोटाळ्याचा पैसा गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी वापरल्याचा सनसनाटी आरोप आपल्या आरोपपत्रात केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यावरून दिल्लीत आपच्या कार्यालयावर भापने मोर्चा काढत आंदोलन केले तसेच, केजरीवलाच्या यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आप विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

‘ईडी’च्या दाव्यानुसार ‘आप’च्या सर्वेक्षण टीममध्ये सहभागी असलेल्या गोव्यातील कार्यकर्त्यांना सुमारे 70 लाख रुपये रोख दिले गेले.

New Delhi
Dabolim Airport: व्हिलचेअरसाठी खंडणी! दाबोळीवर इंग्लंडच्या दिव्यांग ज्येष्ठ महिलेसोबत गैरव्यव्हार, तक्रार दाखल

उत्पादन शुल्क धोरणातून कमावलेल्या कथित 100 कोटी रुपयांच्या "किकबॅक" चा काही भाग आम आदमी पक्षाने गेल्या वर्षीच्या गोवा विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी वापर केला. असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर भाष्य करताना केजरीवाल यांनी हे संपूर्ण प्रकरण ‘बनावट’ असून यामागे भाजपला मदत करण्याचा हेतू असल्याचे म्हटले आहे. केंद्रात सत्तेत असलेला पक्ष तो ईडीसारख्या एजन्सीवर वर्चस्व गाजवत असतात. असे केजरीवाल म्हणाले आहेत.

New Delhi
Mahadayi Water Dispute: मंत्री नाईक माहित नाही पण सार्दिन लोकसभेत म्हादईचा मुद्दा मांडणार - गोवा काँग्रेस

दिल्ली मद्य घोटाळ्यातील 7 आरोपींविरुद्ध सीबीआयने दहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तपास एजन्सीने सांगितले की, ‘आप’चे संपर्क प्रभारी विजय नायर यांनी मोहिमेशी संबंधित काही लोकांना रोख रक्कम घेण्यास सांगितले होते.

गोवा विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांनी केलेल्या खर्चाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात दुसऱ्यांदा गोवा विधानसभा लढविणाऱ्या ‘आप’ने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 3.5 कोटी रुपये एवढा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com