Charles Sobhraj : चिकन काफ्रिअलमुळे गोव्यात आलेला 'चार्ल्स' कसा सापडला पोलिसांच्या ताब्यात?

दिल्लीच्या तिहार तुरुंगातून फरार झालेल्या चार्ल्सला त्याच्या आवडीच्या चिकन काफ्रिअल खाण्यामुळे पर्वरीतील ‘ओ कोकेरो’मधून 1986 साली पोलिसांनी नाट्यमयरित्या पकडले होते.
Charles Sobhraj
Charles SobhrajDainik Gomantak
Published on
Updated on

गुन्हेगारी जगतातील कारवायांमुळे युरोप आणि आशियाई पॅसिफिक देशांमध्ये खळबळ माजवलेल्या चार्ल्स शोभराजला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने वयोमानामुळे मुक्त केले आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून फरार झालेल्या चार्ल्सला त्याच्या आवडीच्या चिकन कॅफ्रिअल खाण्यामुळे पर्वरीतील ‘ओ कोकेरो’मधून 1986 साली पोलिसांनी नाट्यमयरित्या पकडले होते. शोभराजच्या सुटकेच्या वृत्तानंतर पुन्हा एकदा हा किस्सा चर्चेत आला आहे.

‘बिकिनी आणि स्पिटलिंग किलर’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या चार्ल्सवर तब्बल 24 खुनांचे तर तेवढेच लूट, मारामारी, तुरुंगातून फरार होणे इत्यादी गुन्हे दाखल होते. यातील अनेक गुन्हे थायलंड, बँकॉक, तुर्की, फ्रान्स, भारत आणि नेपाळमधील आहेत. पैशांसाठी युरोप, अमेरिका आणि थाई युवतींना वेगवेगळ्या पद्धतीने अंमली पदार्थ, विष देऊन त्याने ठार मारले आहे. चार्ल्सवर जुलै 1976 ला दिल्लीमध्ये फ्रेंच मुलींना विष दिल्याच्या आरोपाखाली खटला सुरू असताना तिहार तुरुंगातून फरार झाला होता. तेव्हापासून देशातील सर्व पोलिस यंत्रणा त्याच्या शोधात होते. आता तो नेपाळमधून सुटला असून पुढील 15 दिवसांत त्याला देश सोडण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या कुख्यात गुन्हेगार चार्ल्सचे भविष्य काय असणार? हा चर्चेचा विषय बनला आहे.

Charles Sobhraj
Charles Sobhraj : 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराजची होणार सुटका, 19 वर्षांपासून तुरुंगात बंद

शेवटची अटक व सुटका नेपाळमध्ये

भारतामधून 2002 मधून फरार झाल्यानंतर चार्ल्सने नेपाळमध्ये काही दिवस मुक्काम ठोकला. चार्ल्स नेपाळमध्ये असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी 1 सप्टेंबर 2003 मध्ये त्याला जेरबंद केले होते.

ऐषोआरामाची सवय

चार्ल्सला ऐषोआराम जीवन जगण्याची सवय होती. उत्तमातील उत्तम जेवण, दर्जेदार वाईन, रत्ने आणि स्त्रियांशी जवळीकतेचा त्याला नाद लागला. त्याने हत्या केलेल्या बहुतांश श्रीमंत मुलींबरोबर त्याचे संबंध होते. त्यांच्यासोबत काही काळ घालवल्यानंतर त्यांचे पैसे लुटून चार्ल्सने त्यांची हत्या केली.

अनेकदा तुरुंगातून फरार

भारतीय वडिल आणि व्हिएतनामी आई यांच्या पोटी व्हिएतनाममध्ये येथे 1944 साली चार्ल्सचा जन्म झाला. आई-वडिल विभक्त झाल्यानंतर 10 व्या वर्षांपासून त्याने गुन्हेगारी जगतामध्ये प्रवेश केला. युरोपमधील अनेक देशांत त्याच्याविरोधात गुन्हे होते व अनेकदा तुरुंगातून तो फरार झाला होता.

‘चिकन कॅफ्रिअल’मुळे अटक

चार्ल्सला मांसाहारी पदार्थ, प्रामुख्याने चिकन कॅफ्रिअलची आवड होती. 1970 नंतर हिप्पींसाठी हँगआऊट प्रसिद्ध बनलेल्या पर्वरी येथील ओ कोकेरो हॉटेल या कॅफ्रिअलसाठी प्रसिद्ध होते. चार्ल्स तिथे हे वाईन आणि कॅफ्रिअलसाठी अधूनमधून येत असे. याची माहिती मिळताच याच हॉटेलमधून मुंबई पोलिस निरीक्षक प्रभाकर झेंडे यांनी सापळा रचून 6 एप्रिल 1986 रोजी त्याला अटक केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com