CAA अंतर्गत नागरिकत्व मिळालेला गोव्यातील ख्रिश्चन व्यक्ती पाकिस्तानात कसा गेला? भारतीय होण्यासाठी 11 वर्षे संघर्ष

Joseph Francis A Pereira: गोव्यातच राहणारे फ्रान्सिस यांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता.
CAA अंतर्गत नागरिकत्व मिळालेला गोव्यातील ख्रिश्चन व्यक्ती पाकिस्तानात कसा गेला? भारतीय होण्यासाठी 11 वर्षे संघर्ष
Joseph Francis A PereiraCM Pramod Sawant Twitter
Published on
Updated on

पणजी: मूळ गोमंतकीय असणाऱ्या कासावली येथील जोसेफ फ्रान्सिस परेरा यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते परेरा यांना आज (२८ ऑगस्ट) नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. फ्रान्सिस परेरा नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात Citizenship Amendment Act (CAA) अंतर्गत नागरिकत्व मिळालेले गोव्यातील पहिले नागरिक ठरले आहेत.

भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर फ्रान्सिस परेरा भावूक झाले. गेल्या अकरा वर्षापासून परेरा भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी प्रयत्न करत होते.

फ्रान्सिस परेरा पाकिस्तानात कसे गेले?

फ्रान्सिस परेरा यांचा जन्म गोव्यात पोर्तुगीज राजवट असताना झाला. १९६१ पूर्वीच परेरा शिक्षणासाठी पाकिस्तानला गेले. परेरा पाकिस्तानला गेल्यानंतर त्यांना तिथे नागरिकत्व स्वीकारवे लागले. काहीकाळ तिथेच वास्तव्य केल्यानंतर त्यांनी गोव्यातीलच एका महिलेशी लग्न केले. लग्न केल्यानंतर परेरा पुन्हा गोव्यातील कासावली येथेच स्थायिक झाले.

गोव्यातच राहणारे फ्रान्सिस यांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता.

CAA अंतर्गत नागरिकत्व मिळालेला गोव्यातील ख्रिश्चन व्यक्ती पाकिस्तानात कसा गेला? भारतीय होण्यासाठी 11 वर्षे संघर्ष
मोठी बातमी! गोव्यात CAA अंतर्गत पाकिस्तानच्या ख्रिश्चन नागरिकाला दिले जाणार भारतीय नागरिकत्व

भारतीय नागरिकत्वासाठी अकरा वर्षे संघर्ष

फ्रान्सिस परेरा यांनी भारतीय नागरिकत्वासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर चार सदस्यीय समितीद्वारे त्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. समितीने परेरा यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली. परेरा ११ सप्टेंबर २०१३ पासून गोव्यात राहत आहेत. त्यामुळे ते सीएए कायद्यांतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी पात्र ठरतात.

अखेर बुधवारी (२८ ऑगस्ट) परेरा यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर परेरा भावूक झाले. गेल्या अकरा वर्षापासून ते यासाठी प्रयत्न करत होते, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांमुळे माझे स्वप्न साकार झाले असेही परेरा म्हणाले.

Citizenship Amendment Act

भारतीय संसदेने डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेत CAA ला मंजुरी दिली, पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मार्च २०२४ मध्ये याचे कायद्यात रुपांतर झाले.

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे (CAA) ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात स्थलांतर केलेल्या पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशातील हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, शीख व ख्रिश्चन नागरिकांना भारतीय नागरिकत्व घेता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com