Noise Pollution: क्लबचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट कसं झालं? उच्च न्यायालयाचा उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना सवाल

Club Noise Pollution: डिलीट झालेले फुटेज पुन्हा मिळवता येईल का याबाबत देखील न्यायालयाला माहिती देण्यात यावी असा आदेश देण्यात आला आहे.
Noise Pollution: सीसीटीव्ही फुटेज डिलीट कसं झालं? उच्च न्यायालयाचा उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना सवाल
High Court Goa Recruitment 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असणाऱ्या क्लबचे सीसीटीव्ही डिलिट कसे झाले, असा सवाल उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उपस्थित केला आहे. फुटेज पुन्हा मिळवता येईल का? याबाबत पडताळणी करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

उत्तर गोव्यात ध्वनी मर्यादा आणि वेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही क्लब विरोधातील प्रकरण सध्या न्यायालयात सुरु आहे. याप्रकरणी मंगळवारी (०४ जानेवारी) सुनावणी पार पडली असता, न्यायालयाने उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना सीसीटीव्ही फुटेजवरुन जाब विचारला. क्लबचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट कसे झाले, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला?

Noise Pollution: सीसीटीव्ही फुटेज डिलीट कसं झालं? उच्च न्यायालयाचा उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना सवाल
Bicholim Mining Issue: अखेर आठ दिवसानंतर 'वेदांता' सुरु, डिचोलीत खनिज वाहतुकीचा मार्ग मोकळा

तसेच, डिलीट झालेले फुटेज पुन्हा मिळवता येईल का याबाबत देखील न्यायालयाला माहिती देण्यात यावी असा आदेश देण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये उत्तर गोव्यातील काही क्लब ध्वनी मर्यादा आणि वेळेचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com