Assagao Fire News: आसगाव पंचायतीजवळील घराला आग; 2 लाखांचा मुद्देमाल जळून खाक

5 लाखांचे नुकसान वाचवण्यात दलाला यश
Assagao Fire News
Assagao Fire NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Assagao Fire News: आसगाव पंचायतीजवळ असलेल्या एका घराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले.

Assagao Fire News
Goa Daily News Wrap: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याची पदक कमाई सुरुच, वाचा दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर

माहितीनुसार, प्रदीप मांद्रेकर यांच्या मालकीचे हे घर आहे. या आगीत घरातील इलेक्ट्रिकल्स एलईडी, लाईट, साउंड सिस्टम, होम थिएटर, कपडे, फ्रीज, कपाट, वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तू जळून खाक झाल्या.

यामध्ये एकूण 2 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. तसेच 5 लाखांचे नुकसान वाचवण्यात दलाला यश आले.

आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.