Goa Daily News Wrap: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याची पदक कमाई सुरुच, वाचा दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर

Goa Breaking News 03 November 2023: गोव्यातील आजच्या ताज्या घडामोडी...
Goa Live Updates 03 November 2023
Goa Live Updates 03 November 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Daily News Wrap: गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याची पदक कमाई सुरुच असून, राज्याने आत्तापर्यंत 47 पदकं जिंकली आहेत. यात दहा सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

तसेच, राज्यात आज फेरीबोटीतून दुचाकी, चारचाकी आणि प्रवासी वाहनांसाठी शुल्क आकारणीचे नवे दर जाहीर केले आहेत. दोन महिन्यानंतर झालेल्या हॅलो गोंयकार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

ईडीसीला २०२२-२३ साली ६२.३५ कोटींचा नफा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ईडीसीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. ईडीसीला २०२२-२३ साली ६२.३५ कोटींचा नफा झाल्याची माहिती.

मुख्यमंत्री रोजगार योजनेत बदल होऊन, योजना जास्त आकर्षक व सोयिस्कर करणार असल्याचे सावंत म्हणाले.

तायक्वांदोमध्ये गोव्याला दोन सुवर्ण

तायक्वांदोमध्ये महिलांच्या गटात रोदाली बरूआला सुवर्ण तर, पुरुषांच्या स्पर्धेत गोव्याला सुर्वर्णासह रौप्यपदक मिळाले आहे.

आरजीचा लोकसभेसाठी 'एकला चलो रे' चा नारा

रिव्हॉल्युशनरी गोवन् पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत 'एकला चलो रे' चा नारा देत स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. इंडिया आघाडीकडून युतीसाठी प्रस्तावाची वाट पाहणार नाही असे अध्यक्ष मनोज परब यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा गोव्याला कसा फायदा होणार? मुख्यमंत्री म्हणतात...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होत असताना त्याचा राज्यातील सर्व तरुणांना फायदा होणार असून, पहिल्यांदाच राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पदकं मिळाली आहेत. तसेच, राज्यातील क्रीडा संबधित पायाभूत सुविधा निर्माण व्हायला मदत होईल असे सावंत म्हणाले.

तसेच, राज्यात क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

कुळेत लवकरच मेडिकल डिस्पेन्सरी - मुख्यमंत्री

कुळेत लवकरच मेडिकल डिस्पेन्सरी होईल अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी हॅलो गोंयकार कार्यक्रमात दिली.

सेपाक टकरॉत गोव्याला 03 सुवर्ण, 01 कांस्य

सेपाक टकरॉत महिला गटात क्वाड प्रकारात गोव्याने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर, रेगु प्रकारात गोव्याला कांस्यपदक मिळाले आहे. दुहेरी व क्वाडमध्ये गोवा पुरुष संघाने सुवर्ण पदक पटकावले आहे.

समुद्रकिनारी सुरक्षेवर 4 वर्षात 190 कोटी खर्च तरी देखील बुडण्याच्या घटना सुरूच - आलेमाव

"गोवा सरकारने गेल्या 4 वर्षात समुद्रकिनारी सुरक्षेवर 190 कोटी खर्च करूनही गोव्यात बुडण्याच्या घटना सुरूच आहेत. पर्यटन विभागासोबत असणारे कंत्राटदार लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा करतात परंतु जेव्हा प्रत्यक्ष मृत्यू होतात तेव्हा लाइफगार्ड जागेवरून गायब असतात. यामागील गूढ तपासण्याची गरज आहे," असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

गोव्यात दोन दिवसांसाठी यलो अलर्ट

गोव्यात दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 04 आणि 05 नोव्हेंबर रोजी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

फेरी सेवा शुल्क आकारणीसंबंधी मंत्री,मुख्यमंत्र्यांकडे करणार चर्चा!

फेरी बोट सेवांना शुल्क आकारणसंबंधी दिवाडीच्या लोकांना सूट मिळावी या मागणीसह मी मंत्री सुभाष फळदेसाईं आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. मला खात्री आहे की दिवाडीच्या लोकांना या शुल्क आकारणीतून सूट देण्यात येईल. कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाईंची माहिती.

कोलवा समुद्रकिनाऱ्यावर एकजण बुडाला

कोलवा समुद्रकिनाऱ्यावर मित्रांचा एक गट पोहण्यासाठी गेला असता, त्यातील एकजण समुद्रात बुडाला असल्याचे समोर आले आहे. सध्या त्याचा शोध घेणे सुरू आहे

मांडवी पुलावरून एका व्यक्तीने मारली उडी!

मांडवी पुलावरून एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. रणजित केणी (45, पणजी) असे त्या व्यक्तीचे नाव असून किनारी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला उपचारासाठी GMCला पाठवण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती राहणार उपस्थित

37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये 9 नोव्हेंबरला दुपारी 2.30 वाजता होणार आहे. या सोहळ्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर उपस्थित राहणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

मोफत IVF उपचार करणारे गोवा ठरणार पहिले राज्य; 100 हून अधिक दाम्पत्यांनी केली नोंदणी

गोवा हे IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) उपचार मोफत करणारे पहिले राज्य ठरणार आहे. गेल्या काही काळात आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या प्रयत्नांतून बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. आता या IVF उपचारांसाठी 100 हून अधिक दाम्पत्यांनी नोंदणी केली आहे.

आसगाव पंचायतीजवळील घराला आग

आसगाव पंचायतीजवळ असलेल्या घराला भीषण आग. घरातील वस्तू जळून खाक झाल्या असून यामध्ये एकूण 2 लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण कळू शकले नाही.

Fire News
Fire NewsDainik Gomantak

खांडेपार हायस्कुलमध्ये चोरी!

खांडेपार एमआयबीके हायस्कुलमध्ये चोरी. 2 लाख 80 हजार रुपयांची रोकड लंपास. फॉरेन्सीक पथक घटनास्थळी दाखल.

सारमानस-पिळगाव रस्त्यावरील जंक्शन कामाची पायाभरणी

सारमानस-पिळगाव रस्त्यावरील जंक्शन होणार वाहतुकीस सुरक्षित. जंक्शनच्या विकसित कामाची आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते पायाभरणी. पस्तीस लाख रुपये खर्चून करणार विकास.

Mla Premendra Shet
Mla Premendra ShetDainik Gomantak

ऑनलाईन जुगारप्रकरणी एकाला अटक

आके मडगाव येथील अॅटलास बिझनेस सेंटर दुकानात क्राईम ब्रँच पोलिस पथकाने काल रात्री उशिरा छापा टाकून ऑनलाईन जुगारप्रकरणी झेयावूल्ला हमसाभवी याला अटक केली. कारवाईत ४ हजार रोकड रक्कम व जुगाराचे इतर साहित्य जप्त.

क्रीडा स्पर्धेच्या खर्चाचे ऑडिट करा! काँग्रेसची मागणी

पणजी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी राज्य वित्त नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया करायला हवी होती, ती झाली नाही. केवळ दोनच देकार आल्यास पुन्हा निविदा प्रक्रिया करावी लागते, ती केली गेली नाही.

कारण मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील व्यक्तीला मुख्य निविदा दिली गेली, तीही व्यक्ती गुजरातमधील आहे. या क्रीडा स्पर्धेच्या खर्चाचे ऑडिट व्हायला हवे, अन्यथा न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

स्वयंअपघातात युवकाचा मृत्यू

म्हापशातील दत्तवाडी येथे झालेल्या स्वयंअपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. मेहबूब खान पठाण उर्फ अर्षद (31, रा. कुचेली, म्हापसा) असे मृताचे नाव. गुरुवारी रात्रीची घटना.

Accident
AccidentDainik Gomantak

पणजी ते गोवा विद्यापीठ मार्गावर दिवाळीनंतर धावणार इलेक्ट्रिक बस

कदंब परिवहन महामंडळ (KTC) लवकरच पणजीच्या सार्वजनिक वाहतूक नेटवर्कमध्ये इलेक्ट्रिक बसेसचा ताफा सादर करणार आहे. या बसेस दिवाळीनंतर गोवा विद्यापीठ मार्गावर धावतील. ज्यामुळे प्रवाशांना शाश्वत आणि सोयीस्कर वाहतुकीचे साधन मिळेल.

या बसेस पणजी बस टर्मिनसपासून दोना पावला मार्गे गोवा विद्यापीठात जातील.

स्मार्ट सिटी पणजी प्राधिकरणाने परवडणारी भाडे रचना निश्चित केली आहे, ज्यामुळे वाहतुकीचा हा हरित मार्ग प्रवाशांच्या विस्तृत श्रेणीसाठी उपलब्ध आहे.

कॅसिनोंसाठी आता ‘सीआरझेड’ची परीक्षा

मांडवी नदीत असलेल्या कॅसिनोवाहू जहाजांना आता गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सागरी अधिनियमांचा (सीआरझेड) भंग झाला नसल्याचा दाखला घ्यावा लागणार आहे.

पर्वरीत दोन वर्षांत 6 पदरी उड्डाणपूल; ‘भाम्बू’ला ठेका

राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पर्वरी येथे सहा पदरी उड्डाणपूल बांधण्याचे कंत्राट राजेंद्रसिंह भाम्बू इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीने मिळवले आहे. त्यांनी या कामासाठी ३६४.६८ कोटींची बोली लावली होती. २४ महिन्यांत त्यांना हे काम करावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com