Mahadayi Water Dispute: म्हादईविरोधातील आंदोलन पेटू लागले आहे. त्या आंदोलनाचा भडका उडू नये यासाठीच राज्य सरकारने सभागृह समिती स्थापन करून हा विषय शीतपेटीत टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हादई विषयावरील अर्ध्या दिवसाच्या चर्चेत सरकारने सभागृह समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर असून, त्यांच्यासह इतर सदस्यांमध्ये सरदेसाई यांचाही समावेश केलेला आहे.
आपण त्यासाठी सहकार्य करू, पण सभागृहाबाहेर म्हादईसाठी जे लढा देत आहेत, असे सरदेसाई यांनी सांगितले.
न्यायालयात जाण्यापूर्वी सभागृह समितीमध्ये हा विषय येईल. त्यानंतर तो न्यायालयात जाईल. तोपर्यंत कर्नाटकातील विधानसभा निवडणुकाही होतील.
या निवडणुकीनंतर कर्नाटकात भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास म्हादईचे पाणी वळविले जाणारच आणि मग ते आम्हाला ‘न्यायालयात या, तेथे आपण भांडुया’, असे सांगतील. हा सर्व प्रकार नियोजनबद्धरित्या तयार केलेला आहे, असा आरोपही सरदेसाई यांनी केला.
भाजपने बदलले बैठकीचे ठिकाण
विषयावरून राज्यभर वातावरण तापलेले आहे. भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक यापूर्वी राजधानी पणजीतच होत होती, परंतु यावेळी पक्षाने सावधगिरी बाळगत ही बैठक तिसवाडी तालुक्याच्या बाहेर नेलेली आहे.
वास्को येथे भाजपच्या या बैठकीस 170 प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारवर अगोदरच म्हादईच्या विषयावरून विरोधकांकडून जोरदार टीका झालेली आहे. त्यामुळेच भाजपने यावेळी ठिकाण बदलल्याची चर्चा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.