Goa: 'हॉटेल्स, शॅक्स,पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्या'

पर्यटन हंगाम तोंडावर असताना स्थानिक लोकांचे व्‍यवसाय बंद
Hotels, shacks and  tourism related businesses in Goa
Allow to start
Hotels, shacks and tourism related businesses in Goa Allow to start Dainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली: कोविड महामारीच्या (Covid-19) दणक्याने जर्जर झालेल्या राज्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना पन्नास टक्के तत्त्वावर, सरकारी नियमांचे यथायोग्य पालन करून व्यवसाय सुरू करण्याची मुभा देण्यात यावी. त्याचप्रमाणे कोविड प्रतिबंधक लसीचे (Vaccine) दोन्ही डोस घेतलेल्या पर्यटकांना (Tourist) राज्यात प्रवेश देण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्‍याकडे मागणी करणार आहे, असे कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी सांगितले.

Hotels, shacks and  tourism related businesses in Goa
Allow to start
देशी पर्यटकांची सध्या गोव्याकडे धाव

पर्रा येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत मंत्री लोबो बोलत होते. किनारी भागातील छोटी-मोठी हॉटेल्स, शॅक्स तसेच पर्यटनाशी संबंधित सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश असावा, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले. कोविड महामारीमुळे राज्यात प्रथम लागू करण्यात आलेली टाळेबंदी आणि त्यानंतरच्या कर्फ्यू काळात सामान्य माणसाचे व्यवसाय बंद राहिल्याने त्यांचे कंबरडेच मोडून गेले होते. अशावेळी पर्यटन हंगाम तोंडावर असताना स्थानिक लोकांचे बंद पडलेले व्‍यवसाय कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करीत पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, ही सरकारची प्रमुख जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. याच धर्तीवर राज्यातील कॅसिनोत मर्यादित प्रमाणात पर्यटकांना प्रवेश दिल्यास सरकारी महसुलात भर पडणार असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले.

Hotels, shacks and  tourism related businesses in Goa
Allow to start
South Goaत वाढतेय देशी पर्यटकांची संख्या

आग्‍वाद खासगी संस्‍थेच्‍या ताब्‍यात नाही

ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या आग्वाद येथील पुरातन तुरुंगाचे सुशोभीकरण तसेच नूतनीकरणाचे काम दिवसरात्र सुरू आहे. येत्या गोवा मुक्‍ती दिनी पंतप्रधान मोदी यांच्‍या हस्‍ते या संग्रहालयात रूपांतरण करण्यात आलेल्या वास्तूचे उद्‍घाटन होणार आहे. ही वास्तू कुठल्याही खासगी संस्था तसेच हॉटेल व्यावसायिकांच्या ताब्यात देण्यात येणार नाही, अशी ग्‍वाही यावेळी मंत्री मायकल लोबो यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com