
Hotel Shauryawada Vikas Nana Hande Meeting Goa CM Pramod Sawant
पणजी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल शौर्यवाडाचे मालक विकास नाना हांडे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीची माहिती स्वतः हॉटेल मालकाने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "मी कामानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली."
या भेटीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना “गोव्यात आता हॉटेल शौर्यवाड्याची शाखा सुरू होणार का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काहींनी आपल्या आपल्या शौऱ्यवड्याचे गोवामध्ये लवकरच शाखा सुरू व्हावी...असं म्हटलंय.
दरम्यान, हॉटेल शौर्यवाडा हे महाराष्ट्रात सतत चर्चेत राहिले आहे. पारंपरिक मराठी आतिथ्य आणि आधुनिक सोयी-सुविधांचा मिलाफ असलेले हे हॉटेल देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांमध्येही लोकप्रिय आहे. त्यामुळे या भेटीनंतर गोव्यात हॉटेल शौर्यवाड्याचा विस्तार होणार असल्याच्या चर्चेला अधिक उधाण आले आहे.
हॉटेल शौर्यवाडा हे आजच्या घडीला सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेले एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. या हॉटेलचे इन्स्टाग्रामवर तब्बल ६ लाख १३ हजार फॉलोवर्स आहेत. शौर्यवाडाचे क्रिएटिव्ह रील्स, व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रत्येक नवीन व्हिडिओ काही तासांतच हजारोंच्या संख्येने व्ह्यूज मिळवतो.
हॉटेल शौर्यवाडा हे आपल्या खास पारंपरिक बांधकामशैलीसाठी, स्थानिक खाद्यसंस्कृतीसाठी आणि उत्कृष्ट पाहुणचारासाठी प्रसिद्ध आहे. हॉटेलच्या मालकाकडून नेहमीच नव्या आणि हटके कल्पनांवर आधारित रील्स तयार केल्या जातात, ज्यामुळे तरुण वर्गामध्ये शौर्यवाडाची मोठी फॅन फॉलोइंग निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.