गोव्यातील 'हॉप ऑन हॉप ऑफ' बससेवा बंद

काही वर्षांपूर्वी पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी 'हॉप ऑन हॉप ऑफ' ही खास बस सेवा सुरू केली होती.
Bus Service
Bus Service Dainik Gomantak

पणजी: मागील 2 वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीचा मोठा फटका गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला बसला आहे. लॉकडाऊन आणि कोरोनासंसर्गाच्या भीतीने अनेक पर्यटकांनी गोव्याकडे पाट फिरवली आहे. परिणामी गोव्याचे (Goa) आर्थिक नुकसान झाले आहे. (Goa News Update)

Bus Service
गोव्यात एप्रिलमध्ये होणार दहावी आणि बारावीची दुसरी सत्र परीक्षा

काही वर्षांपूर्वी पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी 'हॉप ऑन हॉप ऑफ' ही खास बस सेवा सुरू केली होती. पर्यटकांना राज्यातील पर्यटन स्थळे दाखविण्यासाठी या बसचा वापर केला जात होता. मात्र कोरोनामुळे पर्यटन संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे ही बस सेवाही आता बंद पडली आहे.

Bus Service
दिल्लीतील नेत्यांना भेटून विश्‍वजीत राणे परतले

खुले छत असलेल्या या दुमजली बसमधून (Bus) पर्यटकांना ओल्ड गोवा चर्चचे दर्शन घडवले जायचे. राज्य सरकार पर्यटन बळकट करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम, योजना राबवल्या जात आहेत. राज्यात आता हळूहळू पर्यटन हंगाम सुरू होत आहे. पर्यटक (Tourist) पुन्हा एकदा गोव्याची वाट धरत आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक लोकांनी गोव्यात येणे पसंत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com