Stray Cattles: रेडेघाटीतील भटक्या गुरांचा संचार आवरा, वाहनचालकांची मागणी; रस्त्यावर बसणाऱ्या गुरांमुळे मनस्ताप

Valpo News: होंडा ते वाळपई दरम्यानच्या रेडेघाटीतील मार्ग सध्या भटक्या गुरांमुळे वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.
Stray Cattles Valpoi
Stray Cattles ValpoiDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: होंडा ते वाळपई दरम्यानच्या रेडेघाटीतील मार्ग सध्या भटक्या गुरांमुळे वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. दिवसा तसेच रात्रीही मोठ्या प्रमाणात गुरे या रस्त्यावर ठाण मांडून असतात.

विशेषता रात्रीच्या वेळी या रस्त्यावर ठाण मांडणारी गुरे वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहेत. रस्त्याच्या मधोमध बसणारी ही गुरांना चुकवता वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा रस्त्यावर बसलेल्या गुरांचा वाहनचालकांना अंदाज येत नाही, त्यामुळे अपघाताचे प्रसंगीही उद्‍भवतात.

Stray Cattles Valpoi
Goa Road Accident: दोन अपघातांमध्ये तिघे ठार, कुठ्ठाळीत दोघे दुचाकीस्वार तर रामनगर येथे कारचालकाचा मृत्यू

सत्तरीत गुरांची समस्या जटिल

सत्तरी तालुक्यात सध्या भटक्या गुरांची समस्य जटिल होत चालली आहे. अनेक गुरांच्या मालकांनी आपल्या गुरांची देखभाल करणे सोडून दिल्याने ही गुरे दिवसभर कुठेही भटकत असतात व रात्री उबेसाठी रस्त्यावर ठाण मांडतात, असे काही स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com