होंडा पंचायत कचरा व्यवस्थापनामध्ये स्वयंपूर्ण बनणार

या कचरा (Garbage) प्रक्रिया प्रकल्पाच्या बांधकामांचा खर्च पंचायत फंडातून करणार असल्याची माहिती पंचायत सुत्रांकडून मिळाली आहे. सद्या पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे.
कचरा व्यवस्थापन (Garbage) पायाभरणी कार्यक्रमाला उपसरपंच शशीकला राणे, पंच निधी गावकर, प्रतिक्षा गावडे, सया पावणे, विक्रांत देसाई, पंचायत सचिव शभांजी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
कचरा व्यवस्थापन (Garbage) पायाभरणी कार्यक्रमाला उपसरपंच शशीकला राणे, पंच निधी गावकर, प्रतिक्षा गावडे, सया पावणे, विक्रांत देसाई, पंचायत सचिव शभांजी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.Dainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: पर्ये मतदार (Parye constituency) संघात येणाऱ्या होंडा पंचायतीच्या (Honda Panchayat) वतीने सुमारे वीस लाख खर्चून उभारण्यात येणाऱ्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणी सरपंच आत्मा गावकर (Atma Gavkar) यांच्या हस्ते आज भुईपाल सालेली सीमेवर असलेल्या पंचायत मालकीच्या बागायती मधील एका कोपऱ्यात करण्यात आली. यामुळे होंडा पंचायत क्षेत्रातील कचरा (Garbage) विल्हेवाट लावण्यासाठी फार सोयीस्कर होणार असल्याने होंडा पंचायत कचरा व्यवस्थापनासाठी स्वयंपूर्ण बनणार आहे.

कचरा व्यवस्थापन (Garbage) पायाभरणी कार्यक्रमाला उपसरपंच शशीकला राणे, पंच निधी गावकर, प्रतिक्षा गावडे, सया पावणे, विक्रांत देसाई, पंचायत सचिव शभांजी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
Goa Election: पर्ये मतदारसंघात ‘राणे’ कुटुंबियांची मक्तेदारी

आजच्या काळात संपूर्ण राज्यात कचरा विल्हेवाट लावण्याची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे, त्याच प्रमाणे येणाऱ्या काळात सदर कचऱ्या संबंधी योग्य पाऊले न उचल्यास ही समस्या आणखीनच जटील बनण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने होंडा पंचायत क्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योजना मार्गी लावण्यासाठी पंचायत मंडळाने पुढाकार घेऊन आपल्या मालकीच्या जागेत एम आर एफ योजने अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे होंडा पंचायत क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोपे होणार आहे.

कचरा व्यवस्थापन (Garbage) पायाभरणी कार्यक्रमाला उपसरपंच शशीकला राणे, पंच निधी गावकर, प्रतिक्षा गावडे, सया पावणे, विक्रांत देसाई, पंचायत सचिव शभांजी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
Goa: पर्ये सत्तरीत जलकुंभाचे भूमीपूजन

या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या बांधकामांचा खर्च पंचायत फंडातून करणार असल्याची माहिती पंचायत सुत्रांकडून मिळाली आहे. सद्या पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे, त्यामुळे सदर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची फार मोठी समस्या होती, परंतू या प्रकल्पाचे काम मार्गी लागल्या नंतर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सरपंच आत्मा गावकर यांनी दिली.

सदर पायाभरणी कार्यक्रमाला उपसरपंच शशीकला राणे, पंच निधी गावकर, प्रतिक्षा गावडे, सया पावणे, विक्रांत देसाई, पंचायत सचिव शभांजी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com