Mahadayi Water Dispute: 'म्हादई'बाबत अमित शाहांचे फर्मागुडीत मौन, हुबळीतील सभेत मात्र मोठे वक्तव्य...

काय म्हणाले शाहा घ्या जाणून...
Amit Shah on Mahadayi
Amit Shah on MahadayiDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Shah on Mahadayi Water Dispute: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची 16 एप्रिल रोजी फोंड्यातील फर्मागुडी येथे सभा झाली. या सभेत शाह म्हादईबाबत काही बोलतील, गोवेकरांना दिलासा देतील, अशी अपेक्षा होती. तथापि, म्हादईच्या मुद्यावर अमित शाहांनी त्या सभेत मौन बाळगले.

तथापि, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी हुबळीत सोमवारी झालेल्या प्रचारात मात्र शाह यांनी म्हादईच्या मुद्यावर पुन्हा भाष्य केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारची म्हादईबाबतची भूमिका आणि गोवा राज्याबाबतचा सापत्नभाव दिसून येत आहे, अशी चर्चा आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभुमीवर कर्नाटकात पुन्हा सत्ता राखण्यासाठी भाजपच्या केंद्रातील नेत्यांकडून प्रचारसभांचा धडाका लावला जात आहे. सोमवारी अमित शाह यांची हुबळीत सभा झाली.

Amit Shah on Mahadayi
गोव्यातील भाजप नेत्याने वाढदिवसावर उडवले 23 कोटी रूपये; 100 जणांना तुर्कीमध्ये दिली पार्टी

या सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने म्हाईदवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी एक हजार कोटींहून अधिक निधी मंजूर केला आहे.

यापुर्वी जेव्हा कर्नाटक, गोवा आणि केंद्रात काँग्रेस सरकार होते तेव्हा म्हादईचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न केले गेले नाहीत. उलट काँग्रेसने 1980 मध्ये म्हादईच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार केला होता.

तथापि, आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने म्हादई पाणी प्रश्न सोडवला आहे. सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात भाजप सरकारला यश आले आहे, असेही शाह यांनी म्हटले आहे.

Amit Shah on Mahadayi
IMD Goa Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी 'या' दिवशी पडणार पाऊस; आगामी 4 दिवस तापमान वाढणार

यापुर्वी बेळगाव येथील सभेत बोलताना अमित शाह यांनी, कर्नाटक आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन म्हादईचा प्रश्न मिटवला आहे. म्हादई कर्नाटकला दिली, असे वक्तव्य केले होते. तथापि, काही दिवसांपुर्वीच गोव्यातील सभेत मात्र शाहांनी म्हादईबाबत काहीही बोलणे टाळले होते.

केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या सुधारित डीपीआरला 31 डिसेंबर रोजी मंजुरी दिल्यापासून हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. गोव्यात सेव्ह म्हादई मोहिमेसही सुरवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com