गोव्यातील भाजप नेत्याने वाढदिवसावर उडवले 23 कोटी रूपये; 100 जणांना तुर्कीमध्ये दिली पार्टी

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांचा दावा
Girish Chodankar
Girish Chodankar Dainik Gomantak
Published on
Updated on

Girish Chodankar: गोव्यात सत्ताधारी भाजपमधील एका बड्या नेत्याने त्याच्या वाढदिवसाला चक्क 23 कोटी रूपये खर्च केला असून या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी 100 जणांना तुर्की या देशात पाठवले गेले होते, असा दावा काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

Girish Chodankar
IMD Goa Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी 'या' दिवशी पडणार पाऊस; आगामी 4 दिवस तापमान वाढणार

चोडणकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात चोडणकर यांनी म्हटले आहे की, गोव्यातील सर्वाधिक लॅव्हिश पन्नासावा वाढदिवस गोव्यात साजरा होत नसून तो तुर्कीमध्ये साजरा होत आहे. त्यासाठी 100 जणांना तुर्कीला नेले आहे.

यात उद्योगपती, नोकरशहा, शुभचिंतकांचा समावेश आहे. येथे पार्टीत बीफचाही समावेश आहे. या सगळ्याला सुमारे 23 कोटी रूपये खर्च आला आहे.

यातून भाजपचे ढोंग उघड होत आहे. बीफच्या मुद्यावर भाजपची भूमिका राज्यानुसार बदलते. या वाढदिवस साजरा करण्यातून भाजपचा ढोंगीपणा समोर आला आहे.

Girish Chodankar
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेल दर स्थिर; जाणून घ्या आजच्या किंमती

भाजपच्या या ढोंगीपणावर पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये बोलावे. आणि 23 कोटी कुठून आले, ते देखील स्पष्ट करावे, असेही चोडणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, चोडणकर यांनी ट्विटमध्ये कुणाचेही नाव घेतलेले नाही, पण त्यांचा रोख भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आहे, हे स्पष्ट होते. कारण सोमवारीच मुख्यमंत्र्यांचा 50 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com