Michael Douglas: बॉलीवूड पार्टी, दाक्षिणात्य कलाकारांची भेट आणि इफ्फी... असा आहे अभिनेते मायकल डग्लस यांचा दौरा

इफ्फीमध्ये सत्यजित रे पुरस्काराने होणार गौरव
Michael Douglas _ catherine zeta jones
Michael Douglas _ catherine zeta jones google image
Published on
Updated on

IFFI 2023: हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लस आपल्या कुटुंबासह पणजीत होणाऱ्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) भारतात येणार आहेत.

त्यांच्या प्रवासादरम्यान, ते देशातील काही भागात भ्रमण करणार आहेत तसेच बॉलीवूड पार्टीला उपस्थित राहण्याचीही त्यांची योजना आहे.

डग्लस यांचे एकूण 78 कार्यक्रम असणार आहेत. यात गोव्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आयोजित केलेल्या डिनरलाही ते उपस्थित राहणार आहेत.

त्यांचा IFFI मध्ये सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाईम अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे.

दरम्यान, डग्लस हे दक्षिण भारतातील एका शहरात जाऊन दक्षिणेतील शीर्ष कलाकारांना भेटू शकतात आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतात.

Michael Douglas _ catherine zeta jones
लग्न ठरत नसल्याच्या रागातून वडिलांसह बहिणीचा केला खून; गुजरात-महाराष्ट्रामार्गे गोव्यात येऊन लपला...

मायकल डग्लस हे त्यांची अभिनेत्री पत्नी कॅथरीन झेटा-जोन्स आणि मुलगा डायलन यांच्यासह IFFI साठी भारतात येणार आहेत. आठवडाभराच्या भारत दौऱ्यात डग्लस आणि त्यांचे कुटुंबीय भारतातील काही भागात भ्रमण करणार आहेत.

तसेच बॉलीवूड पार्टीला देखील उपस्थित राहतील. डग्लस यांचे मित्र आणि निर्माता शैलेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे. तेच डग्लस यांना भारतात आणत आहेत. डग्लस यांच्याशी त्यांचे ईमेलद्वारे संभाषण झाले आहे.

27 नोव्हेंबरला गोव्यात त्यांचा सन्मान होईल. तत्पुर्वी 24 तास आधी ते गोव्यात येणार आहेत. त्या रात्री त्यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.

Michael Douglas _ catherine zeta jones
Loutolim Villagers: लोटलीतील शेतकऱ्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; बोरीतील नवीन पुलाला विरोध

याशिवाय डग्लस यांच्या कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बॉलीवूड पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात बॉलीवूड सेलिब्रिटी सहभागी होतील.

28 नोव्हेंबर रोजी इफ्फीचा समारोप असणार आहे. त्या दिवशी डग्लस यांना IFFI मध्ये प्रतिष्ठेचा सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्कार देण्यात येणार आहे. या दौऱ्यात डग्लस दक्षिणेतील काही शहरांमध्ये जाऊन टॉपच्या दाक्षिणात्य कलाकारांनाही भेटणार असल्याचे समजते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com