Land Scam: पणजीत हॉलिडे कंपनीला 2.5 कोटींचा गंडा

दोघांवर गुन्हा- ताळगावातील जमीन परस्पर विकून फसवणूक
Money |Land Issue
Money |Land IssueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Land Issue: मे. न्यू वेव्ह हॉलिडे कंपनीच्या संचालकांनी ताळगाव येथील खरेदी केलेली जमीन परस्पर दुसऱ्याला विकून अडीच कोटींचा गंडा घातल्याने दोनापावला येथील एलॉय ए. एन. एस. गोन्साल्विस ऊर्फ इलॉई गोन्साल्विस आणि जेनेट ऊर्फ जानेट ऊर्फ जनिता ऊर्फ जेनेट गोन्साल्विस या दोघांविरुद्ध पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार कंपनीचा संचालक सुनील छुगानी याने ताळगाव येथील सर्वे क्रमांक .242/1, 236/अ व 244/अ मधील जमीन संशयिताकडून खरेदी केली होती.

या जमिनीसाठी त्यांनी अडीच कोटी रुपये दिले होते. त्यानंतर संशयितांनी हीच जमीन तक्रारदाराला कोणतीही कल्पना न देता दिल्ली येथील इंडिया ओशन वर्ल्ड प्रा. लि. या कंपनीचे प्रोप्रायटर अजय धवन यांना विकली होती.

संशयितांना ही जमीन तक्रारदाराला विकल्याचे माहीत होते, तरी त्यांनी परस्पर दुसऱ्याला जमीन विकण्याचा हा व्यवहार पूर्ण करून तक्रारदाराची फसवणूक केली.

Money |Land Issue
Goa Crime: गौरी खून प्रकरणातील बिद्रेला कैद्यांकडून मारहाण

तक्रारदाराने पैसे परत करण्यास संशयितांना सांगितले मात्र, त्याने ते देण्यास नकार दिला. उलट संशयिताने तक्रारदाराला धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पणजी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Enemy Property Case Goa
Goa Rakshan Yatra 2026
Goa Land Grabbing Special Court
Adivai Villagers Land Sale
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com