Goa Crime: गौरी खून प्रकरणातील बिद्रेला कैद्यांकडून मारहाण

गौरी आचारी खून प्रकरणातील संशयित गौरव बिद्रे याला कोलवाळ कारागृहातील कैद्यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.
Goa Crime|Beating
Goa Crime|BeatingDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: गौरी आचारी खून प्रकरणातील संशयित गौरव बिद्रे याला कोलवाळ कारागृहातील कैद्यांनी केलेल्या मारहाणप्रकरणी प्रधान जिल्हा व सक्ष न्यायाधीश शेरीन पॉल यांनी काल जेलरला याप्रकरणी उत्तर सादर करण्याचे निर्देश देऊन त्यावरील सुनावणी सोमवारी 30 जानेवारीला ठेवली आहे.

संशयित गौरव बिद्रे याने न्यायालयात दोन वेगवेगळे अर्ज सादर केले आहेत. एका अर्जात त्याने कारागृहात असलेल्या सौझा लोबो रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणातील संशयित छोटू व इतर दोघे मिळून तिघांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे.

Goa Crime|Beating
Goa News: ...यासाठी बिल्डरकडून पाच लाख घेणारा नगरसेवक कोण ?

या मारहाणीमुळे त्याचे पुढील दोन दात तुटले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्यामुळे त्याला कारागृहातील इतर खोलीत हलवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. दुसऱ्या अर्जात त्याने दात तुटल्याने त्यावरील उपचार करण्यासंबंधी निर्देश द्यावेत,अशी विनंती केली होती. ती न्यायालयाने स्वीकारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Tourist Deaths 2026
Pradeep Yadav Bail Rejected
Goa Nightclub Fire Case
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com