Ashwem And Mandrem Beach Holi Party 2023: जागतिक महिलादिन, होळी आणि त्यानंतर धुलिवंदन या पार्श्वभूमीवर दोन दिवस काही ठिकाणी संगीत रजनींना मुभा होती. परंतु होळीच्या तिसऱ्याही दिवशीही किनारी भागातील काही क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये कर्णकर्कश आवाजात संगीत पार्ट्या आयोजित केल्या होत्या.
‘होळीच्या पार्ट्या’ म्हणून ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. त्यातील बेकायदा पार्ट्या मांद्रे पंचायतीने उधळून लावल्या.
या पार्ट्यांसाठी काही जणांनी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत तर काहींनी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत परवाने घेतले होते. काहींनी तर परवानेच घेतले नव्हते.
आश्वे-मांद्रे किनारी भागात एका बाजूने वाहतुकीची कोंडी तर दुसऱ्या बाजूने होळीच्या नावावर तिसऱ्याही दिवशी बेकायदा पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते.
मांद्रे सरपंच ॲड. अमित सावंत यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन ‘तुमच्याकडे परवाने नसतील तर पार्ट्या बंद करा’, अन्यथा तुमच्यावर पंचायतीमार्फत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानंतर काही जणांनी पार्ट्या बंद केल्या, तर काही पार्ट्या सुरूच होत्या.
एका क्लबला चक्क महिनाभराचे परवाने
आश्वे येथील ‘आजुले’ या क्लबसाठी पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत तब्बल एका महिन्याचे परवाने दिले गेले. हा जो सावळा गोंधळ सुरू आहे त्याबद्दल मांद्रे सरपंच अमित सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.
अशा प्रकारचे परवाने नियमात बसतात की काय, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.