Tax slab 2022 -2023
Tax slab 2022 -2023Dainik Gomantak

Budget: यंदाचा अर्थसंकल्‍प स्वयंपूर्ण, राज्‍याची दिशा ठरविणारा

मुख्‍यमंत्री सावंत : 2022-23चे बजेट 90 टक्के उतरविले सत्यात
Published on

सरकारच्या वतीने सादर केलेला 2022-23चा अर्थसंकल्प ९० टक्के सत्यात उतरविला असून ९८ टक्के महसुलाचे उद्दिष्ट गाठले आहे. आता 2023-24 चा अर्थसंकल्प हा स्वयंपूर्ण गोव्याची दिशा ठरविणारा आणि अंत्योदय धोरणाला वाहिलेला असेल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिले.

अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीसाठी विभाग प्रमुख आणि सर्व विभागांच्या मुख्य लेखापालांची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गेल्या वर्षापासून केंद्र सरकारकडून जीएसटी परतावा बंद झाला आहे. तरीसुद्धा महसूल वाढविण्याचे आमचे उद्दिष्ट 98 टक्के पूर्ण झाले. त्यामुळेच 2022-23च्या अर्थसंकल्पातील ९० टक्के योजना आणि तरतुदी प्रत्यक्षात उतरवू शकलो आहे. 2023-24 चा अर्थसंकल्प हा राज्य सरकारने स्वीकारलेल्या स्वयंपूर्ण गोव्याला अनुसरून असेल.

प्रामुख्याने विविध क्षेत्रातील स्थानिक उत्पादनांची निर्मिती यासाठी संबंधित क्षेत्रांना प्रोत्साहन आणि अंतोदय पद्धतीने सामाजिक कल्याणचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. शिक्षण, आरोग्य, आदिवासी कल्याण, कृषी विकास, ग्रामीण विकास अशीही उद्दिष्टे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर या अर्थसंकल्पाचा कराचा बोजा पडणार नाही याची काळजीही सरकारने घेतली आहे.

Tax slab 2022 -2023
Heat Wave In Goa: काळजी घ्या! राज्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

जी-20, राष्ट्रीय स्पर्धांसाठी विशेष तरतूद

लवकरच राज्यात होणाऱ्या जी-20 परिषदेच्या बैठका आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्याआधारे साधनसुविधांची निर्मिती आणि संबंधित क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासंबंधीची अर्थसंकल्पाची बांधणी करण्यात आली असल्‍याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com