वास्कोत होलीकोत्सवाला उत्साहात प्रारंभ

उद्या गुलालेत्सवाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात
Holi celebrations
Holi celebrationsdainik gomantak
Published on
Updated on

बेलालाय : वास्कोत होलीकोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. बेलालाय वास्को येथे शेकडो भाविकांनी होळीला श्रीफळ वाढवून होळीचे पुजन केले. उद्या गुलालेत्सवाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. (Holi celebrations begin in Vasco)

आज बेलाबाय तसेच वास्कोतील इतर भागात होळीचे पुजन करून प्रार्थना केली. होळी चरणी वर्षपद्धतीप्रमाणे बेलबाय वास्को (vasco) येथे होळीचे दहन करून पूजन करण्यात आले. भाविकांनी दुपारी चार वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. संध्याकाळी सात वाजता होळी पूजन झाल्यानंतर शेकडो भाविकांनी होळी चरणी श्रीफळ वाढवून नतमस्तक झाले. वर्षपद्धतीप्रमाणे प्रमाणे यंदाही बेलाबाय येथे वास्को शहरातील वेगवेगळ्या ठीकाणाहून भाविकांनी येऊन होळीकोत्सवात (celebration of Holi) आपण सहभाग दर्शविला.

Holi celebrations
पुण्यातील 'त्या' युवतीला कोलवा पोलिसांनी केलं पालकांकडे सुपूर्द

दरम्यान श्रीखाप्रेश्वर बेलाबाय येथे होळी उत्सवा प्रित्यर्थ मंडपात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवारी संध्याकाळी होळी (Holi) पूजन झाले. उद्या शुक्रवार दि. 18 मार्च रोजी गुलालोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शनिवार 19 मार्च रोजी 7 वा. श्री वाप्रेश्वर बेलाबाय नाट्य मंडळातर्फे पारंपरिक "दशावतारी काला"(Dashavatari Kala) सादर केले जाईल. तद्नंतर श्री खाप्रेश्वर तरुण हौशी कलाकार बेलाबाय तर्फे "आमी ना कमी" नाटक सादर केले जाईल.

1. रविवार दि. 20 मार्च 2022 रोजी ५ वर्ष ते १५ वर्ष वयोगटासाठी 'एकेरी नृत्य स्पर्धा'

2. सोमवार दि. 21 मार्च 2022 रोजी वाजता मुरमुगांव तालुका मर्यादित 'गवळण गायन स्पर्धा'

3. मंगळवार दि. 22 मार्च 2022 रोजी रात्री 9 वा. कलाचेतना वळवई, निर्मीत भिवपाची गरज ना

4. बुधवार दि. 23 मार्च 2022 रोजी रात्री 7 वा. श्री खाप्रेश्वर बेलाबाय तरुण हौशी कलाकार “कारोके” सादर करणार आहेत.

5. शनिवार दि. 26 मार्च 2022 रोजी संध्या. 4 वा. तद्नंतर धुळवट पुजा करण्यात येणार आहे.

तरी अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी (Competitors) 9158437052, 7875862618, 8308330790, 9764268311, 8308330790 या नंबर वर संपर्क साधावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com