Heavy Rain: अवकाळी पावसाचा फटका; ‘पेडे’च्या स्वयंपाक तंबूत शिरले पाणी

Heavy Rain: कर्मचाऱ्यांची धावपळ; विरोधकांकडून टीका
Heavy Rain:
Heavy Rain:Dainik Gomantak
Published on
Updated on

Heavy Rain: म्हापसा येथील पेडे स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी (ता.८) खेळाडू तसेच इतर प्रतिनिधींसाठी जेवण बनविण्यासाठी उभारलेल्या स्वयंपाक तंबूमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले. त्यामुळे व्यवस्थापन तसेच कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

Heavy Rain:
National Games Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यजमान गोव्याचे देदीप्यमान यश, ‘टॉप टेन’मध्ये स्थान

परिणामी, कर्मचाऱ्यांना या तंबूमधील साहित्य दुसऱ्या तंबूत हलविण्याची वेळ आली. कालांतराने व्यवस्थापनाने या स्थितीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, विरोधकांनी स्पर्धेच्या नियोजनावर टीका करीत सरकारचा निषेध नोंदविला. तसेच, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत या अस्वच्छतेमुळे किचनस्थळी स्वयंपाक करणे थांबवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, स्वयंपाक कक्षातील सर्व साहित्य व इतर सामग्री बाजूच्या दुसऱ्या तंबूत हलविण्यात आले. जवळपास हजारपेक्षा अधिक खेळाडू व सपोर्ट स्टाफचे जेवण याठिकाणी दररोज बनविले जाते.

याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे युवा नेते विवेक डिसिल्वा म्हणाले की, पावसाचे वेळापत्रक पाहून राष्ट्रीय क्रीडा भरविण्याची आवश्यकता होती. राष्ट्रीय स्पर्धेच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे.

ही नैसर्गिक आपत्ती

याबाबत ठिकाण अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुळात, जेवण किंवा इतर सामग्री जमिनीवर ठेवलीच नव्हती. घडलेला प्रकार हा नैसर्गिक आपत्तीचा होता. केवळ इथेच नाही, सर्व ठिकाणी पाणी साचले. कुणीतरी निचरा रोखल्याने रात्रीच्या वेळी इथे पाणी भरले. परंतु सकाळपासून आम्ही पाणी बाहेर काढून स्थितीवर नियंत्रण मिळविले.

साहित्य हलविले दुसरीकडे

पेडे स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्समध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बॉक्सिंग तसेच हॉकी खेळप्रकार सुरू होते. या मैदानावरच खेळाडू तसेच इतरांसाठी जेवण बनवले जाते. परंतु, पावसाच्या दृष्टिकोनातून स्वयंपाकस्थळी आवश्यक खबरदारी घेण्यात आलेली दिसली नाही. परिणामी, स्वयंपाकासाठी उभारलेल्या तंबूत पाणी भरल्याने सर्वत्र चिखल झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर जेवण व इतर साहित्य दुसरीकडे हलविण्याची वेळ आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com