Cabo De Rama: गोव्यात श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ल्याकडे दुर्लक्ष! 'काब द राम'चे संवर्धन आवश्‍यक

Cabo De Rama Fort Goa: दक्षिण गोव्यातील खोल गावात स्थित शेकडो वर्षांचे ऐतिहासिक महत्त्व असलेला काब द राम हा किल्ला दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण असून तो अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.
Cabo De Rama Fort heritage conservation
Canacona CABO DE RAMA FORTDainik Gomantak
Published on
Updated on

Cabo De Rama Fort Needs Urgent Preservation

सासष्टी: दक्षिण गोव्यातील खोल गावात स्थित शेकडो वर्षांचे ऐतिहासिक महत्त्व असलेला काब द राम हा किल्ला दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण असून तो अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. मात्र या किल्ल्याकडे दुर्लक्षच झालेले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हा किल्ला पोर्तुगिजांनी सोंदा (सौंदेकार) राजाकडून १७६३ साली जिंकला होता, तेव्हा पोर्तुगिजांनी तिथे नवे तट वगैरे बांधले होते. हा गोव्यातील एक सर्वात मोठा किल्ला आहे असे इतिहास प्रेमी योगेश नागवेकर सांगतात. याला पूर्वी खोल गड म्हणूनही ओळखले जात होते. वनवासात जाताना रामाचे इथे वास्तव्य होते.

तसेच परशुराम हे सुद्धा इथे काही काळ राहिले होते, त्यामुळे पोर्तुगिजांनी या किल्ल्याला काब द राम हे नाव दिले असे इतिहास सांगतो असे नागवेकर सांगतात. गोव्यात अनेक सरकारे आली पण एकाही सरकारला या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व कळले नाही. त्यामुळे या किल्ल्याकडे दुर्लक्षच झाले. काही वर्षांपूर्वी प्रजल साखरदांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व एक प्रस्ताव सरकारला सादर केला होता.

त्यानुसार गोवा पर्यटन विकास महामंडळाने अभिलेखागार व पुरातत्त्व खात्याच्या सहकार्याने दुरुस्ती करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली होती. पण नंतर ते शक्य झाले नाही असे नागवेकर यांनी सांगितले. २०२१ साली गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे २९.७ कोटी रुपये खर्चून नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव होता. मात्र अजूनपर्यंत त्या संदर्भात काहीही करण्यात आलेले नाही.

Cabo De Rama Fort heritage conservation
Mega Projects in Goa: गोव्यात का होतोय 'मेगा प्रोजेक्ट्स'ना विरोध? 'गावपण' गमावण्याची भीती की सरकारी 'यंत्रणेवर' अविश्वास?

शौचालयाची सोय, रस्त्यांची दुरुस्ती आवश्‍यक

स्थानिक लाझियो फर्नांडिस यांनी सांगितले की, इथे हजारो पर्यटक किल्ला पाहायला येतात मात्र इथे शौचालयाची व्यवस्था नाही. किल्ल्यात काही पडकी घरे आहेत. तिथे शौचालयाची व्यवस्था करणे शक्य आहे. त्याच बरोबर येथील रस्ते सुद्धा खराब झाले आहेत. काही पर्यंटक आपली वाहने कुठेही पार्क करतात. त्यासाठी या किल्ल्यावर सरकारने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे फर्नांडिस सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com