AAP Goa: 'आप'ला राष्ट्रीय दर्जा मिळाल्याचा पालेकरांना आनंद; आपचे अस्तित्व सिद्ध

AAP Goa: 'आप'ने दिल्लीपासून सुरवात करुन देशाच्या राजकारणात आपली वेगळी अशी जागा तयार केली आहे.
Adv. Amit Palekar | Arvind Kejriwal
Adv. Amit Palekar | Arvind KejriwalDainik Gomantak

AAP Goa: दहा वर्षांपूर्वी आम आदमी पक्षाची (आप) स्थापना झाली होती. त्या काळात पक्षाने दिल्लीपासून सुरवात करून देशाच्या राजकारणात आपली वेगळी अशी जागा तयार केली आहे. भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाचे राजकारण करून देशात काँग्रेस आणि भाजपला पर्याय असल्याचे राष्ट्रीय दर्जा मिळवून सिद्ध केले आहे.

पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्याचा आनंद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, आमदार व्हेंझी व्हिएगस, उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि इतर नेत्यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन साजरा केला. दिल्लीतील एमसीडी निवडणूक व गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतून ‘आप’ला चांगला प्रतिसाद लाभला आहे.

Adv. Amit Palekar | Arvind Kejriwal
Goa Wellness Tourism : आरोग्य क्षेत्रातही गोव्यात पर्यटन विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आज आप राष्ट्रीय पक्ष झाला असून याचे श्रेय जनतेला जाते. कारण त्यांनी आमच्यावर विश्‍वास दाखवला आहे. आज दिल्लीत आणि पंजाब येथे पक्ष सत्तेत आहे, तर दिल्लीतील एमसीडीमध्येसुद्धा सत्तेत आला आहे. येणाऱ्या काळात पक्ष आणखी बळकट होणार आहे, असे ॲड. पालेकर म्हणाले.

देशात भ्रष्टाचारमुक्त याचा अर्थ काँग्रेस आणि भाजपमुक्त होतो. दिल्लीतील एमसीडी निवडणुकीत जनतेने भ्रष्टाचारमुक्त दिल्ली करून दाखवली आहे. प्रथम काँग्रेसकडून दिल्ली जिंकली आणि आता भाजपच्या तावडीतून एमसीडी मुक्त केली आहे, असे वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

‘भ्रष्टाचारमुक्त विकास भाजपला शक्य नाही’

गोव्यातील जनतेने ‘आप’ला विधानसभेत आणून आमच्यावर विश्‍वास दाखवला आहे. आज दिल्लीतील जनतेने पुन्हा एकदा एमसीडीच्या निवडणुकीत देखील उत्तम शिक्षण आणि आरोग्य सुविधा यावर मतदान केले आहे, परंतु गोव्यात या दर्जाचे शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळेल असे वाटत नाही. 2024 असो किंवा 2027 केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला ‘आप’ने दिल्लीत केलेला भ्रष्टाचारमुक्त विकास करून दाखवणे शक्य नाही, असा दावा व्हिएगस यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com