Odxel: पावसामुळे मातीचे ढीग घुसले वस्तीत, ओडशेलमधील लोकांमध्ये घबराट; राजकीय पाठिंब्याने डोंगरावर बांधकाम होत असल्याची चर्चा

Odxel Taleigao Landslide: परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या ‘गोमन्तक टीव्ही’च्या वार्ताहर व कॅमेरामनला चित्रीकरण करण्यास बांधकामाशी संबंधित असलेल्या तेथील व्यक्तीने मज्जाव केला.
Odxel Taleigao Landslide
Odxel Taleigao NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दोन दिवसांपूर्वी ओडशेलवाडा - ताळगाव येथे डोंगरमाथ्यावरील बांधकामुळे तेथील मातीचा ढीग कोसळून पावसाच्या पाण्याबरोबर वस्तीमध्ये घुसल्याने तेथील स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. भर पावसात ही माती खाली आल्यास मोठे नुकसान होणार असल्याची भीती तेथील स्थानिकांनी व्यक्त केली.

तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या ‘गोमन्तक टीव्ही’च्या वार्ताहर व कॅमेरामनला चित्रीकरण करण्यास बांधकामाशी संबंधित असलेल्या तेथील व्यक्तीने मज्जाव केला. त्यामुळे या बांधकाम सुरू असलेल्या जमीनमालक तसेच विकसक मुजोर बनले असून सरकारी यंत्रणेला घाबरत नसल्याचे दिसून आले.

डोंगरमाथ्यावरील खोदकामामुळे पावसाच्या पाण्याने ही माती वस्तीत घुसणार याची पूर्ण कल्पना ताळगाव पंचायत, एनजीपीडीएला देण्यात आली होती. मात्र, या बांधकामालाच राजकारण्यांचा पाठिंबा असल्याने एनजीपीडीए या बांधकामाला पाठिशी घालत आहे. कारण स्थानिक आमदार त्याच्या अध्यक्ष आहेत.

Goa Landslides: निसर्गसाखळीतील अन्य प्राण्यांसोबत सह-अस्तित्व मान्य करून जगल्यासच भविष्यात अशा घटना टाळणे शक्य होईल
Goa NH 66 LandslideDainik Gomantak

त्यामुळे कारवाई होण्याऐवजी या बांधकामालाच नियम धाब्यावर बसवून परवाने देण्यात आलेले आहेत. ताळगाव पंचायतीने या बांधकामाला परवाना दिलेला नाही असा दावा केला आहे. वस्तीतील लोकांना पावसाळ्यात धोका आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Odxel Taleigao Landslide
Panjim: डोंगर खोदल्‍याने ओडशेलवाडा चिखलमय, मदतीसाठी आलेल्या नेत्यांमध्ये हमरातुमरी; आमदार जेनिफर यांच्यासह चौघांविरोधात पोलिस तक्रार

पावसाच्या पाण्याबरोबर माती लोकवस्तीत

मिळालेल्या माहितीनुसार, या ओडशेलवाडा - ताळगाव येथे ज्या ठिकाणी डोंगरमाथ्यावर खोदकाम करून मोठा खड्डा खणला गेला आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळेच मातीचे ढीग कोसळून पाण्याबरोबर माती वस्तीतील पायवाटेवर घुसून चिखलमय झाले आहे. सुमारे १० पेक्षा अधिक घरांची वस्ती तेथे आहे. त्यापैकी चार ते पाच घरांमध्ये हा मातीमिश्रीत पाणी घुसल्याने लोकांचे हाल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com