Panjim: डोंगर खोदल्‍याने ओडशेलवाडा चिखलमय, मदतीसाठी आलेल्या नेत्यांमध्ये हमरातुमरी; आमदार जेनिफर यांच्यासह चौघांविरोधात पोलिस तक्रार

Jennifer Monserrate And Cecil Rodrigues Controversy: ओडशेलवाडा-ताळगाव येथील डोंगरपठारावर खोदकाम करून तेथे मातीचा थर रचून ठेवण्यात आला होता, तो पावसामुळे कोसळला.
Panjim
PanjimDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : ओडशेलवाडा-ताळगाव येथील डोंगरपठारावर खोदकाम करून तेथे मातीचा थर रचून ठेवण्यात आला होता, तो पावसामुळे कोसळला. त्‍यामुळे पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून येत पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीत घुसल्याने स्थानिकांना मन:स्‍ताप सहन करावा लागला. दरम्‍यान, यावेळी त्‍यांच्‍या मदतीसाठी आलेल्या ‘आप’च्या नेत्या सिसिल रॉड्रिगीस व स्थानिक आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

जेनिफर यांनी सिसिल यांना ढकलून देण्‍याचा प्रकार घडला. तसेच ताळगावचे पंच सिडनी बार्रेटो यांनी तेथील स्थितीचे छायाचित्रण करणाऱ्यांना मज्जाव केला व धक्काबुक्की केली. याप्रकरणी सिसिल यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ओशेलवाडा येथील डोंगरमाथ्यावर तेथील जमिनीचे मालक सादिक शेख यांनी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून खड्डा काढला आहे. त्याची माती त्याच ठिकाणी ढीग करून ठेवली होती. स्थानिकांनी ही माती तेथून हलवण्याची विनंती मालकाला केली होती. तसेच पावसाळ्यात माती वाहून खाली येऊन मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करून त्याबाबतची तक्रार ताळगाव पंचायत तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

Panjim
Corona In Goa: कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, वास्‍कोत सापडला नवीन कोविड रुग्‍ण, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 257 वर

मात्र कोणीच याची दखल घेतली नाही व काल अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने भीती खरी ठरवली. माती पाण्याबरोबर वाहून गावात आली. पायवाट तर चिखलमय बनली. काहींच्या घरात चिखल व माती गेल्याने ती पुसून काढताना त्‍यांच्‍या नाकीनऊ आले.

दरम्‍यान, पाण्याबरोबर वाहत आलेली माती घरांमध्ये घुसण्याची शक्यता असल्याने लोक रात्रभर जागे राहिले. रात्री भरारी पथकाला माहिती दिल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले, मात्र उद्या सकाळी कारवाई करण्याचे आश्‍वासन देत तेथून निघून गेले.

ओडशेल डोंगरपठारावरील काम ‘अनंतम’ या नावाने सुरू असून त्याचा मालक सादिक शेख आहे. डोंगर सुमारे ४० फूट खोल खोदून माती काढून ती तेथेच ढीग करून ठेवण्यात आली आहे. या डोंगराच्या पायथ्याशी वस्ती आहे. तेथे ४ ते ६ इंच जाडीची संरक्षक भिंत बांधण्यात आली असून तीसुद्धा या पाण्याच्या लोटामुळे कलंडण्याच्या मार्गावर आहे. शिवाय खोदकाम केलेल्‍या खड्ड्यात पाणी साचल्याने दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे या बांधकामाला विविध खात्यांनी दिलेल्या परवान्यांची तपासणी करण्यात यावी, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह जलस्रोत, नगरनियोजन, वन व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी वेळ न दवडता पाहणी करावी, तोपर्यंत बांधकामाला स्थगिती द्यावी व ते बेकायदेशीर असल्यास मालकाविरोधात फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सिसिल व कुएल्‍हो यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला केलेल्या पत्रामध्ये केली आहे.

Panjim
Goa News: राज्यात पावसाचं धूमशान, विविध ठिकाणी पावसामुळे पडझड

व्हिडिओ चित्रीकरणास केला मज्जाव

या घटनेची माहिती मिळताच ‘आप’च्या नेत्या सिसिल रॉड्रिगीस व फ्रान्‍सिस कुएल्‍हो घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ स्थानिक आमदार जेनिफर मोन्सेरात व ताळगाव पंच सिडनी बार्रेटो हेसुद्धा आले. या खोदकामाचा पर्दाफाश झाल्याने आमदार मोन्सेरात व पंच बार्रेटो यांनी व्हिडिओ चित्रीकरणास मज्जाव केला. जेनिफर यांनी तर सिसिल यांना ढकलून दिले तर बार्रेटो हे चित्रीकरण करणाऱ्याच्‍या अंगावर धावून गेले. यावेळी बार्रेटो व त्या व्यक्तीमध्ये धक्काबुक्की झाली.

जेनिफरसह चौघांविरोधात पोलिस तक्रार

सिसिल रॉड्रिगीस यांनी पणजी पोलिसांत दाखल केलेल्‍या तक्रारीत आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्यासह सिडनी बार्रेटो, सादिक शेख (जमीनमालक), मुधीत गुप्ता यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com