गोव्यात आता डोंगरकापणी केल्यास 25 लाखांचा दंड आणि पोलिस तक्रार, TCP मंत्री विश्वजीत राणे अ‍ॅक्शन मोडवर

Hill Cutting Goa: डोंगर कापणीचे प्रकार लोकांनी उजेडात आणावे; गरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांचे आवाहन.
गोव्यात आता डोंगरकापणी केल्यास 25 लाखांचा दंड आणि पोलिस तक्रार, TCP मंत्री विश्वजीत राणे अ‍ॅक्शन मोडवर
Illegal Hill CuttingDainik Gomantak
Published on
Updated on

Hill Cutting to be punishable in Goa

पणजी: डोंगरकापणी रोखण्यासाठी प्रशासनाने गतीने पावले उचलली आहेत. नगरनियोजन कायद्यात दुरुस्ती करून अशी कृत्ये करणांऱ्या धडा शिकवला जाणार आहे. संबंधितांना २५ लाखांचा दंड ठोठावण्यासोबत पोलिस तक्रार केली जाईल, अशी माहिती नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

मंत्री राणे आक्रमक बनले असून, ऑर्चड जमीन 'सेटलमेंट'मध्ये आल्याशिवाय भूखंड पाडता येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. वन खात्याच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विस्ताराने भाष्य केले. ते म्हणाले, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या प्रत्येक डोंगरकापणीच्या घटनेची नगरनियोजन खात्याने दखल घेतली आहे.

डोंगर कापणीला 'टीसीपीने परवानगी दिलेली नाही; परंतु लोक खात्याकडेच बोट दाखवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धारखंडमध्ये 100 प्लॉट; कारवाईचा आदेश

डोंगर कापणीचे प्रकार लोकांनी उजेडात आणावे. वाळपई मतदारसंघातील धारखंड भागात १०० भूखंड तयार करण्यात आले असल्याचे आपणास पंच सदस्यांनी सांगितले. तेथे अधिकारी तत्काळ कारवाई करतील. सध्या टीसीपीने ९०० प्रकरणी कारवाई केली आहे, अशी माहितीही राणे यांनी दिली.

गोव्यात आता डोंगरकापणी केल्यास 25 लाखांचा दंड आणि पोलिस तक्रार, TCP मंत्री विश्वजीत राणे अ‍ॅक्शन मोडवर
Mumbai Goa Highway: महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली, रामदास कदमांनी भाजप मंत्र्यांचा राजीनामाच मागितला

मंत्री राणे म्हणाले..

1) मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत उपरोक्त विषयी विस्ताराने चर्चा करण्यात आली. डोंगर कापणी करणाऱ्यांची हयगय करण्यात येणार नाही.

2) ऑर्चड म्हणजेच बागायती जागेत भूखंड तयार करण्यासह डोंगर कापणीच्या गुन्ह्यांची यादी केली जाईल व त्यानुसार दंडाची रक्कम नक्की केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com