Goa Road: ‘मोपा’च्या रस्त्याचे गडकरींच्या हस्ते उद्‌घाटन; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

Mopa Road Inauguration: नव्या रस्त्यासाठी टोल आकारणी होणार की नाही यावरून चर्चा सुरू
Mopa Road Inauguration: नव्या रस्त्यासाठी टोल आकारणी होणार की नाही यावरून चर्चा सुरू
Pramod Sawant, Nitin GadkariCanava
Published on
Updated on

राष्ट्रीय महामार्ग ६६ ते मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा उन्नत महामार्ग १३ जुलैपासून जनतेसाठी खुला होणार आहे. ११ जुलै रोजी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या जोड महामार्गाचे उद्‌घाटन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सध्या सुके कुळण येथून वारखंड-नागझरकडे जाणारा रस्ता रुंदीकरण करून तोच रस्ता विमानतळाकडे जाण्यासाठी वापरण्यात येत आहे. हा रस्ता आठ किलोमीटरचा आहे तर नवीन महामार्ग हा केवळ सहा किलोमीटरचा आहे.

सध्याच्या रस्त्यावरून जास्तीत जास्त ४० किलोमीटर वेगाने वाहन हाकता येते तर नव्या महामार्गावर ८० किलोमीटर वेगाने वाहन चालवता येणार आहे. सध्याच्या रस्त्यावर दोन गतिरोधक असून नव्या रस्त्यावर गतिरोधक नसतील. या नव्या रस्त्यासाठी टोल आकारणी होणार की नाही यावरून बरीच चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dhangar Community ST Status
Goa Police Recruitment
Pramod Sawant Convoy Accident
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com