Salpe Lake: साळपे तलावासंदर्भात लढा सुरू राहील! आल्वारीस यांचा इशारा; कडक उपाययोजनेची आवश्यकता

Goa Salpe Lake: गेल्या ३० वर्षांपासून साळपे तलावाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये भातलागवड केली नव्हती. साळपे तलावातील प्रदूषित पाणी शेतीत घुसून शेतजमीन खराब झाली.
Salpe Lake
Salpe LakeDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: उच्च न्यायालयाने साळपे तलावसंदर्भातील प्रदूषणाबद्दलची जनहित याचिका निकाली काढली असली तरी आमचा लढा सुरूच राहील, असे अर्जदार प्रो. आंतोनियो आल्वारीस यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन योग्य प्रकारे होत नसेल तर परत एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा त्‍यांनी दिला आहे.

गेल्या ३० वर्षांपासून साळपे तलावाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये भातलागवड केली नव्हती. साळपे तलावातील प्रदूषित पाणी शेतीत घुसून शेतजमीन खराब झाली.

Salpe Lake
Salpe Lake Pollution: साळपे तलावात सांडपाणी सोडणे ताबडतोब थांबवा! प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाचा आदेश

दोन-तीन वर्षांपूर्वी यंत्र साधनांचा वापर करून ही शेतजमीन परत एकदा लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मात्र साळपे तलावातील प्रदूषित पाणी शेतीत जाऊ नये यासाठी कडक उपाययोजनेची आवश्यकता आहे, असे आल्वारीस यांनी सांगितले.

Salpe Lake
Famous Lake In Konkan: कोकणातल्या हिरवळीत लपलेलं रत्न 'धामापूर तलाव', पर्यटकांनो पावसाळ्यात नक्की भेट द्या

उच्च न्यायालयाने चार वर्षांपूर्वी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देताना मडगाव नगरपालिका व सांडपाणी साधनसुविधा विकास महामंडळाला आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com