Famous Lake In Konkan: कोकणातल्या हिरवळीत लपलेलं रत्न 'धामापूर तलाव', पर्यटकांनो पावसाळ्यात नक्की भेट द्या

Sameer Amunekar

कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात वसलेला धामापूर तलाव हा कोकणातील एक प्राचीन व नैसर्गिक सौंदर्याने नटलेला जलाशय आहे.

Famous Lake In Konkan | Dainik Gomantak

धामापूर तलाव

सुमारे 500 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा तलाव केवळ पर्यटनाच्या दृष्टीनेच नव्हे तर पर्यावरणीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Famous Lake In Konkan | Dainik Gomantak

१५३०च्या सुमारास बांधकाम

धामापूर तलावाचे बांधकाम १५३०च्या सुमारास, शिलाहार काळात किंवा त्याच्या थोड्याच काळानंतर झाले असावे, असे मानले जाते.

Famous Lake In Konkan | Dainik Gomantak

निसर्ग

धामापूर तलावाच्या आजूबाजूला दाट वनराई असून येथे अनेक प्रकारचे पक्षी, मासे आणि वनस्पती सापडतात. तलावात निळ्या पाण्याचे प्रतिबिंब आणि सभोवतालच्या हिरव्यागार टेकड्या पर्यटकांना भुरळ घालतात.

Famous Lake In Konkan | Dainik Gomantak

फोटोग्राफी

तलावात होणारी नौकाविहार सेवा पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे संथ बोटिंगचा अनुभव घेतानाच पक्षीनिरीक्षण, फोटोग्राफी आणि नैसर्गिक शांततेचा अनुभव घेता येतो.

Famous Lake In Konkan | Dainik Gomantak

देवीचे मंदिर

धामापूर गावातील प्रसिद्ध भगवती देवीचे मंदिर या तलावाजवळच आहे. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. तलाव आणि मंदिराचे हे धार्मिक संमेलन या स्थळाला आध्यात्मिक महत्त्वही प्रदान करते.

Famous Lake In Konkan | Dainik Gomantak
Famous Waterfall In Konkan | Dainik Gomantak
येथे क्लिक करा