Goa: न्‍हावेलीत ‘अवजड’ दुखणे! आरटीओचे दुर्लक्ष

Goa: न्‍हावेली-साखळी येथून क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन धोकादायक स्थितीत वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकांकडे पोलिस, आरटीओचे दुर्लक्ष
Heavy Loaded Truck
Heavy Loaded TruckDainik Gomantak
Published on
Updated on

न्‍हावेली-साखळी येथून क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन धोकादायक स्थितीत वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकांकडे पोलिस आणि वाहतूक खात्याच्या आरटीओ अधिकाऱ्यांकडून साफ दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अवजड मालवाहू ट्रक क्षमतेपेक्षा जास्त माल हौद्यात लादून थेट गोव्यात प्रवेश करतात, पण चेकनाक्यावर कुणाचेही लक्ष या प्रकाराकडे जात नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे ट्रक साखळी, माशेल किंवा उसगाव-पाळी आदी भागातून बिनधास्त वाहतूक करीत असल्याने धोका वाढला आहे. साखळी-पाळी महामार्गावर न्हावेली येथे तर अपघाताची शक्‍यता खूप पटीने वाढली आहे.

Heavy Loaded Truck
Congress: राज्यातील चेकपोस्ट सीसीटीव्ही दुरुस्त करा,भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होईल

राज्यात अनेक ठिकाणी अजून पोर्तुगीज काळातील साकव व पूल (Bridge) आहेत. त्‍यांची क्षमता मर्यादित असताना या अवजड ट्रकांवर क्षमतेपेक्षा जास्त माल लादला जातो. भाडेपट्टी जास्त मिळत असल्याने हा प्रकार वाहतूकदार कंपन्या व ट्रकवाल्यांकडून होत आहे. या प्रकाराकडे पोलिस व वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे.

कर्नाटक राज्यातील चोर्लाघाटातून बहुतांश मालवाहू ट्रक क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन येतात. हे ट्रक (Truck) बऱ्याचदा रात्रीच्या वेळी गोव्यात प्रवेश करतात. मात्र त्‍याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. काय आहे ते द्यायचे आणि पुढे जायचे असा हा प्रकार चेकनाक्यावर चालत आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

Heavy Loaded Truck
फूड ट्रक आणि तृप्तता...

क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेण्याच्या प्रकारामुळे रस्त्यांवर वाढलेली झाडे तसेच वीजवाहिन्‍या तोडण्याचे प्रकारही अधूनमधून घडत आहेत. त्यामुळे स्थानिकांना त्रासदायक ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजतारा तोडून ट्रकवाले पळ काढतात. परिणामी तेथील रहिवाशांना मन:स्ताप सहन करावा लागतो. पोलिस आणि वाहतूक खात्याने याप्रकरणी संयुक्त मोहीम हाती घेऊन क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या ट्रकांना गोव्यात प्रवेशच देऊ नये, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच उद्‌भवला होता बाका प्रसंग

दोन दिवसांपूर्वी साखळी-पाळी महामार्गवरील न्हावेली-कुडणे येथे अवजड मालवाहू ट्रकाने वीजतारांना धक्का दिला. रात्रीच्यावेळी हा प्रसंग उद्भवल्यामुळे विजांचा चकचकाट झाला. त्यामुळे घाबरलेल्या ट्रकचालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला असता तो एका कुंपणावर जाऊन स्थिरावला. सुदैवाने कुंपण व ट्रकाला काहीच झाले नसले तरी वीजवाहिन्‍या तुटल्‍यामुळे लोकांना काळोखात रात्र काढावी लागली. ट्रकचालकाने पळ काढल्याने कुणाविरोधात तक्रारही देण्‍यात आली नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

Heavy Loaded Truck
Red Stone Mining : पिसुर्लेत चिरेखाण मालकावर गुन्हा नोंदविण्याची शिफारस

अक्षय सुरेश गावकर, डिंगणे-सुर्ल

राज्यातील वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलिस आणि आरटीओवाल्यांना तैनात करण्यात आले आहे. मात्र वाहतुकीतील अनागोंदीकडे या दोन्ही घटकांकडून साफ दुर्लक्ष होत आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्‍थित झाली तर नवल नाही.

विशांत जयराम नाईक, तिस्क-उसगाव

पोलिस आणि वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक व्यवस्थेतील अनागोंदी दूर करायला हवी. पण त्‍यात ते सपशेल अपयशी ठरत आहेत. साखळी मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याकडे लक्ष देतील काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com