Traffic In Chorla Ghat: चोर्ला घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी! 'अवजड' वाहनांची पुन्हा गर्दी

चोर्ला घाटात सप्टेंबर महिन्यात अवजड वाहनांसाठी बंद घालण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता.
Chorla Ghat
Chorla GhatDainik Gomantak
Published on
Updated on

चोर्ला घाटात अवजड वाहने आणि अरुंद रस्ता यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे; काल रात्री 10 ते 11.30 वाजेपर्यंत एक वाहन खराब झाल्याने रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता अशी माहीती गोवा पोलिसांनी दिली. अखेर पहाटे वाहतूक सुरळीत करण्यात यश पोलिसांना यश मिळाले.

(Heavy traffic jam was witnessed at Chorla ghat due to heavy vehicles and narrow road)

Chorla Ghat
Goa Farming: गोवन ब्रँड म्हणून नाचणी पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देणार; CM प्रमोद सावंत

चोर्ला घाटात सप्टेंबर महिन्यात अवजड वाहनांसाठी बंद घालण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आणि दोन दिवसात बाहेरील वाहनचालकांनी घाटावरच गाड्या अडविणार, भाजी, दुधाची वाहतूकही बंद करणार असा इशारा देताच रात्री 10 ते सकाळी सहापर्यंत या वाहनांना सूट दिली होती.

चोर्ला घाटात 'अवजड' वाहनांची पुन्हा गर्दी!

दरम्यान, त्यामुळे चोर्लातून 24 तास प्रचंड प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी असून या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला, पण कुठेही सीमेवर ‘त्या’ आदेशाची नोटीस लावलेली नाही. त्यामुळे अवजड वाहने दिवसभर घाट रस्‍त्यावरून केरीपर्यंत येतात.

केरीत तपासणी नाक्यावर पोलिस (Police) सतर्क असून ते एकही वाहन पुढे सोडत नाही. त्यामुळे ही वाहने केरी तपासणी नाक्यावर थांबलेली असतात. या वाहनांना येथे जागा अपुरी पडते, शिवाय रस्त्यांच्या दोन्ही बाजूला ही वाहने थांबल्याने इतर केरी तपासणी नाका गाड्यांनी व्यापला जात आहे.

Chorla Ghat
Goa Politics: विरोधी पक्षनेत्यांपेक्षा फुटिरांना सुरक्षेची जास्त गरज- अमित पाटकर

बेळगावहून गोव्यात येणारी वाहने परतवून लावणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण गोवा राज्याच्या घाट रस्त्‍यावर वाहने वळवण्यासाठी पुरेशी जागा नाही. मात्र, ही वाहने सुर्ला येथे कर्नाटक तपासणी नाक्यावर रोखणे शक्य असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

घाटात वाहनांची गर्दी

बेळगावहून येणाऱ्या अवजड वाहन चालकांना गोवा सीमेपर्यंत कुठेही अडवले जात नाही. त्यामुळे ही वाहने थेट घाट रस्त्‍यांने गोव्यात प्रवेश करतात. घाटात त्यांना बंदीबाबत सूचना केल्यानंतर ही वाहने घाटातच रात्री दहा वाजेपर्यंत थांबवली जातात.

अरुंद रस्ता असून काही ठिकाणी ही वाहने थांबलेली असतात, त्यामुळे घाटात अनेक वेळा वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते. शिवाय इतर वाहनांना ये-जा करणे कठीण होते.

तीन वर्षांपूर्वीचा कालबाह्य सूचना फलक

  • गोवा सीमेवरच वाहनचालकांचा गैरसमज होत आहे. कारण 20 मार्च 2019 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत अवजड वाहतूक बंदीचा सूचना फलक लावण्यात आलेला आहे. त्यानंतर अनेक वेळा वाहतुकीबाबत बदल झाले, पण हा फलक कायम राहिले.

  • सप्टेंबरमध्ये उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांना बंदीचा आदेश काढला, परंतु त्याबाबत कुठेही फलक लावला नाही. त्यामुळे अवजड वाहने थेट घाटातून केरीपर्यंत येत असून आपल्याला काहीच सूचना नाही, असे वाहन चालक सांगतात.

  • तीन वर्षांपूर्वीचा सूचना फलक आहे, दिमाखात झळकत असून गोवा शासनाचे अद्याप त्याकडे लक्ष नाही,याबाबत वाहनचालकांतर्फे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com