Ponda Traffic: फोंड्यात वाहतुकीची प्रचंड कोंडी; सर्वत्र बेशिस्‍त पार्किंग

Goa Ponda: विनाहेल्मेट दुचाकीस्‍वारांवरच लक्ष; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Goa Ponda: विनाहेल्मेट दुचाकीस्‍वारांवरच लक्ष; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Ponda TrafficDainik Gomantak

फोंडा शहरात अलीकडे बेशिस्‍त पार्किंग वाढली आहे. लोक मिळेल तेथे आपली वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. आधीच फोंड्यात बेलगाम वाहतूक, त्‍यातच या बेशिस्‍त पार्किंगमुळे अधिकच अडचणी निर्माण व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे सकाळी-संध्याकाळी शहरातील वाहतूक ठप्‍प व्हायला लागली आहे. खास करून फोंडा बाजारात ही स्थिती दिसत आहे.

फोंडा बाजारात संपूर्ण तालुक्यातील लोक येत असल्यामुळे हा भाग नेहमीच व्यस्त असतो. बेकायदेशीर पार्किंगमुळे या भागावर परिणाम व्हायला लागला आहे. खरेतर पार्किंगसाठी नगरपालिकेने जागी रेखित केली असली तरी वाहनचालक आपल्या सोयीप्रमाणे वाहने पार्क करायला लागल्यामुळे वाहतुकीत व्‍यत्‍यय येत आहे.

बाजारातील प्रभू टॉवर्स ते शांतीनगर चौकापर्यंत ही परिस्‍थिती प्रामुख्याने दिसून येते. इथून जवळच फोंडा नगरपालिकेने पार्किंगसाठी मोठी जागा ठेवली आहे. पण तरीसुद्धा वाहनचालक रस्त्यावरच वाहने पार्क करून बाजारहाटाला जातात. आणि सर्वांत कहर म्हणजे वाहतूक पोलिस बघ्याची भूमिका घेतात.

बसस्‍थानकाजवळ फोंडा नगरपालिकेने शास्‍त्री सभागृहाची इमारत मोडून वाहन पार्किंगकरिता जागा केल्यामुळे प्रश्‍न सुटला असे वाटत असला तरी अजून तिथे बेकायदेशीर पार्किंग सुरू आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिससारख्या काही जागांवर वाहने पार्क केल्यामुळे वाहतुकीत खंड पडतो. एकंदरीत वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीर पार्किंग केलेल्यांवर कडक कारवाई केल्याशिवाय हा प्रश्‍न सुटणे शक्य नाही, असे फोंड्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.

फोंडा शहराची व्याप्ती वाढत असल्यामुळे वाढती वाहतूक ही सर्वदृष्ट्या एक डोकेदुखी ठरायला लागली आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना केल्याशिवाय ही डोकेदुखी आटोक्यात येणे कठीण आहे. आता ज्या दिवशी प्रशासनाला जाग येईल, तोच खरा सुदिन असे म्हणावे लागेल.

Goa Ponda: विनाहेल्मेट दुचाकीस्‍वारांवरच लक्ष; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Ponda News: फोंड्यात रस्त्यांचे वाजले तीन-तेरा; सतत खोदकाम

बाजारात वाहन घेऊन येणे बनले जिकिरीचे

वाहतूक पोलिस बहुतांश वेळा हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांना तसेच सीट बेल्ट न लावलेल्या कारचालकांना तालांव देताना दिसतात. त्यामुळे या पोलिसांची ही एकमेव ड्युटी असल्यासारखे वाटायला लागले आहे. बाजाराच्या ठिकाणी तर अभावानेच वाहतूक पोलिस आढळतात आणि असले तरी वाहतुकीत सुसूत्रता आणण्याऐवजी विनाहेल्मेटवाल्यांना तालांव देण्याचे काम करत असतात. त्यामुळे बाजारात वाहन घेऊन येणे म्हणजे मोठे कठीण काम वाटायला लागले आहे. वाहतूक पोलिसांनी मनावर घेतल्याशिवाय हा वाहतुकीचा प्रश्‍न सुटणे केवळ अशक्य आहे.

Goa Ponda: विनाहेल्मेट दुचाकीस्‍वारांवरच लक्ष; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Ponda Death Case: अपघात नव्‍हे, खूनच! ‘गोमन्‍तक’चा दावा ठरला खरा

योग्य जागी वाहतूक पोलिस तैनात हवेत

फोंडा शहर एवढे वाढूनही वाहतूक पोलिस मात्र नको त्या ठिकाणी दिसून येतात. हनुमान मंदिराजवळच्या बगलमार्गावर उभे राहून हेल्मेट तसेच सीट बेल्ट न घातलेल्या वाहनचालकांवर कारवाई करतात. मात्र बाजारातील मुख्य रस्त्यांवर हे पोलिस कधीच दिसत नाही. वास्तविक प्रभू टॉवर्सच्या ठिकाणी, जिथे तीन रस्ते मिळतात तिथे एखादा वाहतूक पोलिस हवाच. पण तिथे यांचे दर्शन कधी होत नाही. बसस्‍थानकावर ते दिसतात खरे, पण त्यामुळे ‘राव रे...वच रे’ करणाऱ्या बसवाल्यांवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com