पणजी, ता. ८ : राज्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला, अनेकांची घरे कोसळली, दरडी कोसळून जनजीवनही विस्कळीत झाले. या पावसामुळे बळीराजाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्यातील कृषी कार्डधारक व इतर मिळून सुमारे २,४५३ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले असून नुकसानीचा आकडा सुमारे ३ कोटी ७० लाख असल्याची माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.
राज्यातील भातशेती पाण्याखाली गेली तसेच इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.
त्या अनुषंगाने कृषी संचालनालयाने राज्यातील नुकसानीची पाहणी केली असता, ७४० हेक्टर क्षेत्रफळातील शेतीचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
कृषीकार्डधारक शेतकरी
आलेले अर्ज - क्षेत्रफळ हेक्टर - रक्कम
सांगे - ३२ - १७.३७ - २०७८०००
मडगाव - २००- ३५.५१. - १४२०४७६
केपे - ९२ - ५.८५ - ४५४६००
फोंडा - १२३ - ४५ - २००४८००
डिचोली - १७० - ७९.४५ - २७५७८८०
म्हापसा - ८०० - २२५ - ५९०००००
धारबांदोडा - २७ - ९.५७ - ११९५५००
तिसवाडी - १६१ - ५२.५- १४४९४००
काणकोण - ४४ - ८.५ - ६०००००
साखळी - १०९ - ५८.५६ - २७७१८००
वाळपई - २५५ - ३८ - ६७०००००
पेडणे - १४१ - ६२.१६५ - १६२९४४००
मुरगाव - ५२ - ११.१८ - ४४७२००
कृषीकार्ड नसलेले शेतकरी
आलेले अर्ज - क्षेत्रफळ हेक्टर - रक्कम
मडगाव - ३५ - ५.२२ - २०८८०८
केपे - ८ - ०.४७ - ३०५००
फोंडा - १२१ - ३४ - १३६००००
डिचोली - ३३ - ६.४ - २८५०००
म्हापसा - १५० - २५.३७५ - ९७००००
धारबांदोडा - २ - ०.८० - ७२००
तिसवाडी - ३० - ३.९८ - १६०४००
साखळी - ५ - ७ - २५००००
वाळपई - ५ - ०.३ - ४००००
पेडणे - ३ - ०.६६ - २६४००
मुरगाव - ५५ - ८.९८ - ३५९२००
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.