Goa Rain Updates: पणजी तुंबली, वीज गायब

गोव्याला पावसाचा जाता जाता जोरदार तडाखा
Goa Rain Updates
Goa Rain UpdatesDainik Gomanatak
Published on
Updated on

पणजी: बुधवारी सायंकाळी अचानक कोसळलेल्या पावसामुळे (Goa Rain Update) पणजी (Panajim)शहर अक्षरश: पाण्यात तुंबले होते. परतीच्या पावसाने जाता जाता राज्याला (Goa) जबर तडाखा दिला. काही भागात वीजही गायब झाली होती त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली.

राज्यात आणखी दोन दिवस परतीच्या पावसाचा मुक्‍काम असेल. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे हातातोंडाला आलेली भात पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कारापूर-तिस्क येथे दुकानावर वीज कोसळल्याची घटना घडली. गेल्या पाच दिवसांपासून राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी आहे. दिवसभर विश्रांती घेणारा पाऊस रात्री वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह कोसळला.

Goa Rain Updates
Goa: दुकानात वीज कोसळल्याने नुकसान
Goa Rain Updates
Goa Rain UpdatesDainik Gomantak

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास राज्याच्या विविध भागात पावसाला सुरवात झाली. त्यानंतर पहाटेदेखील पाऊस सुरूच होता. सायंकाळी साडेसातच्‍या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावत झोडपले. तर वळपाई, सत्तरी, केपे, पेडणे भागातही पावसाने तुफान मारा केला, रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

Goa Rain Updates
Goa: नवरात्रोत्सवानिमित्त शांतादुर्गा देवस्थानात विविध कार्यक्रमांचे आयोजन

पणजीत 2.2 इंच

पणजीतील पाटो परिसर, 18 जून रोड, मार्केट परिसर, मिरामार या सकल भागात पाणी साचले होते. काही ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी पाण्यात बुडाल्या होत्या. वाहने पाण्यातून बाहेर काढताना वाहन चालकांच्या नाकीनऊ आले. बराच काळ रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय अस्थापणात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसानही झाले. संततधारेमुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. पणजीत बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत 2.2 इंच पावसाची नोंद झाली.

Goa Rain Updates
Goa Rain UpdatesDainik Gomantak

9 पासून उसंत

वाळपई परिसरात 2.8 इंच तर पेडणे भागात 2.3 इंच पावसाची नोंद झाली. साखळीत 1.4, केपे 1.6, सांगे 1.2, मडगाव 1.1 आणि पणजीत 0.7 इंच पावसाची नोंद झाली. शनिवारपासून (ता. 9) पाऊस उसंत घेईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com