Goa Monsoon 2024
Goa Monsoon 2024Dainik Gomantak

Goa Monsoon 2024: पावसाचा जोर वाढणार! गोव्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट, सोमवारपासून यलो अलर्टचा इशारा

Goa Weather Update: हवामान खात्याने शनिवार आणि रविवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, सोमवारपासून तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.
Published on

Goa Weather Update

पणजी: गोव्यात पावसाचा जोर वाढला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या वेधशाळेने शनिवारी आणि रविवार (२४ व २५ ऑगस्ट) या दोन दिवसांची ऑरेंज अलर्ट जारी केला असून, सोमवारपासून तीन दिवस (२६, २७ आणि २८ ऑगस्ट) यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दोन्ही जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, सोमावारपासून तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहेत. याकाळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

उत्तर गोव्यात पुढील चार तास मुसळधारेची शक्यता

हवामान खात्याने पुढील तीन ते चार तास मुसळधारेची शक्यता वर्तवली आहे. उत्तरेत पेडणे, बार्देश, डिचोली आणि सत्तरी तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

गोव्यात चोवीस तासांत २.९९ इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोणात ४.७०, साखळीत ३.८१, जुने गोवेत ३.३८ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात एक जून ते २४ ऑगस्ट दरम्यान सरासरी १४२ इंच पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com