Crime: सात महिन्यात 25 जणांशी लग्न, गब्बरलाही नाही सोडले; पैसे, दागिने घेऊन पसार, 23 वर्षीय अनुराधाचा अनेकांना गुलिगत धोका

Rajashtan Crime News: लग्नानंतर दोन ते तीनच दिवसात अनुराधा पतीच्या घरातून पैसे आणि दागिने घेऊन पसार व्हायची.
Wedding
MarriageDainik Gomantak
Published on
Updated on

राजस्थान: लग्न होईनात, मुली मिळेनात याचाच गैरफायद घेऊन एका मोठ्या टोळीने अनेकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या २३ वर्षीय मुलीने केवळ सात महिन्यात तब्बल २५ वेगवेगळ्या मुलांशी विवाह करुन फसवणूक केली. महिलेने या लोकांकडून पैसे आणि दागिने घेऊन पळ काढला. अखेर या मुलीला अटक करण्यात आली आहे.

अनुराधा पासवान (२३) असे अटक करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. सवाई मधोपूर पोलिसांनी भोपाळ येथून अनुराधाला अटक केली आहे. लग्नाळू तरुणांना गाठून त्यांच्याशी विवाह करुन पैसे आणि महागडे दागिने गोळा करुन लग्नाच्या तीन ते चारच दिवसात अनुराधा पसार व्हायची. अनुराधा मोठ्या एका टोळीचा भाग होती व केवळ सात महिन्यात तीने २५ अशाप्रकारचे विवाह करुन त्यांची फसवणूक केली.

Wedding
Electrocution: सत्तरीत वीजेचा धक्का लागून लाईनमनचा मृत्यू, दुसरा कर्मचारी जखमी

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, सवाई माधोपूर येथील विष्णू शर्माने याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शर्माने लग्न जमविण्यासाठी दोन एजंटना दोन लाख रुपये दिले होते. शर्मा आणि अनुराधा यांची भेट घडवून आणली आणि २० एप्रिल रोजी दोघांनी कोर्टात लग्न केले. पण, दोनच दिवसात अनुराधा शर्माच्या घरातून पैसे आणि दागिने घेऊन लंपास झाली.

पोलिसांनी अनुराधा सोबत रोशनी, रघुबीर गोलू, मजबूत सिंग यादव आणि अर्जन यांना देखील अटक केली आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्नाळू तरुणांना हेरुन त्यांना लग्न जमविण्याचे हमी देऊन दोन ते तीन लाख फी स्वरुपात पैसे घेतले जात होते. शर्माला गंडा घातल्यानंतर अनुराधा भोपाळ येथील गब्बरल नावाच्या व्यक्तीचे देखील दोन लाख रुपये घेऊन पसार झाली होती.

Wedding
Heavy Rain In Goa: गोव्याला पावसाने झोडपले; आठवडाभर मुसळधारेचा इशारा, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

अशी होती मोड्स ऑपरेन्डी

अनुराधा आणि त्यांची टोळी लग्नाळू तरुणांना गाठून त्यांना लग्न ठवरुन देऊ अशी हमी द्यायचे. त्यासाठी त्यांच्याकडून दोन लाख रुपये फी स्वरुपात घ्यायचे. लग्नाळू तरुण आणि अनुराधा यांची भेट घडवून आणल्यानंतर त्यांचा रितसर विवाह लावून दिला जायचा. लग्नानंतर दोन ते तीनच दिवसात अनुराधा पतीच्या घरातून पैसे आणि दागिने घेऊन पसार व्हायची.

अशी अडकली जाळ्यात

पोलिस कॉन्स्टेबलला लग्न करायचंय असं भासवून त्याची आणि अनुराधा यांची भेट घडवून आणली, यानंतर या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला व पोलिसांनी सर्वांना अटक केली.

घटस्फोट झाल्यानंतर सुरु केला होता फसवणुकीचा प्रकार

अनुराधाचा मूळ पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर हा प्रकार सुरु केल्याचे उघडकी आले आहे. अनुराधा उत्तर प्रदेशातील एका रुग्णालयात काम करत होती. पतीसोबत घरगुती वादानंतर ती भोपाळमध्ये आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com