Bicholim Heavy Rain: डिचोली येथे आठवडी बाजारावर पावसाचे 'पाणी'; व्यावसायिकांचीे गैरसोय, ग्राहकांचीही पाठ

Bicholim Weekly Market: गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने आज कहर करत डिचोलीत सर्वत्र झोडपून काढले.
Bicholim Weekly Market
Bicholim Heavy RainDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने आज कहर करत डिचोलीत सर्वत्र झोडपून काढले. पावसाच्या तडाख्यात दोन-तीन ठिकाणी झाडांची झालेली पडझड वगळता मोठा अनर्थ घडला नाही. मात्र, आजही डिचोलीच्या आठवडी बाजारावर परिणाम झाला.

पावसाचा तडाखा पाहता, बाजारात येणाऱ्या काही विक्रेत्यांनी सकाळीच बाजारातून गाशा गुंडाळला. डिचोलीसह तालुक्यातील बहुतांश सर्व भागांत आज दमदार पाऊस पडला. दुपारी काही वेळ पावसाने घेतलेली विश्रांती सोडल्यास दिवसभर दमदार पर्जन्यवृष्टी झाली. रस्ते आदी सकल भागांत सर्वत्र पावसाचे पाणी तुंबले होते.

Bicholim Weekly Market
Goa Monsoon: ...अजूनही सुमारे 44 टक्‍क्‍यांची तूट! पुढील आठवड्याभरासाठी 'यलो अलर्ट' जारी

कालच्याप्रमाणे आजच्या पावसावेळी डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात तीन ठिकाणी झाडांची पडझड झाली. सायंकाळपर्यंत मये येथे दोन आणि सुर्ल येथे एक, मिळून तीन झाडे रस्त्यावर पडली, अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली. आठवडी बाजार थंड पर्जन्यवृष्टीचा डिचोलीच्या आठवडी बाजारालाही तडाखा बसला. गेल्या दोन आठवडी बाजारांच्या तुलनेत आज बाजारावर मोठा परिणाम झाला.

दुपारपर्यंत पडलेल्या जोरदार पावसामुळे आठवडी बाजार जवळपास थंड पडला होता. सायंकाळीही पावसाने बाजाराची पाठ सोडली नाही. पावसामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली. तर दुसऱ्या बाजूने विक्रेत्यांचा धंदा पाण्यात बुडाला. एका बाजूने पाऊस तर दुसऱ्या बाजूने ग्राहक नसल्याने विक्रेत्यांना कपाळावर हात मारण्याची पाळी आली. महाराष्ट्रातील आंबडगावसह वेगवेगळ्या भागांतील महिला विक्रेत्या आठवडी बाजारात व्यवसाय करतात. मात्र, आज सकाळीच पावसाच्या तडाख्यामुळे महिला विक्रेत्यांनी परतीची वाट धरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com