हळदोणा: करोना हळदोणा येथील वळवईकर यांच्या घर व गाड्यांना मध्यरात्री आग लागल्याने, तीन दुचाकी व दोन सायकल जळुन खाक झाले आहेत, तसेच घराचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. राज्यात आगीच्या घटना वाढत आहेत. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.(Heavy damage caused by fire in Valwaikar's house in aldona)
गिरीमध्ये अग्नितांडव; घराला आग लागून मोठं नुकसान
म्हापसा शहराजवळच असलेल्या गिरी भागात बुधवारी एका घराला अचानक आग लागली. या आगीत घरातील मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. आगीची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत घराचं मोठं नुकसान झालं.
गिरी म्हापसा येथे बुधवारी एका घराने पेट घेतला. ऐन गणेश चतुर्थीदिवशीच ही आगीची घटना घडली. घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार या आगीत रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, घरसामान जळून खाक झालं असून अंदाजे 50 हजारांहून अधिकचं सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे.
वेर्ला म्हापसा येथे अज्ञाताने दुचाकी जाळल्या
म्हापशाजवळच असलेल्या वेर्ला परिसरात दुचाकींना अज्ञाताने आग लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. फ्रेतसवाडा वेर्ला येथे 3 दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. योगेश मांद्रेकर यांच्या दुचाकींसह शेजारीच उभ्या असलेली चारचाकीचं आगीमुळे मोठं नुकसान झालं आहे. या संपूर्ण प्रकरणात घातपाताचा प्रकार असल्याची परिसरात चर्चा आहे.
बार्देश तालुक्यात दुचाकी जाळण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी कांदोळीत अशाच प्रकारे दुचाकींचं जळीतकांड समोर आलं होतं. किनाऱ्यावर लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या लाईफगार्ड्सच्या दुचाकी अज्ञाताने जाळल्या होत्या. कांदोळी किनाऱ्यावर लाईफगार्डच्या दुचाकींना अज्ञाताने आग लावल्याने एकच खळबळ उडाली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.