Goa Monsoon Update| सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता

राज्यात चालू हंगामात पावसाने कमी हजेरी लावली असली, तरी सप्टेंबर महिन्यात काहीशी दिलासादायक स्थिती आहे.
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात चालू हंगामात पावसाने कमी हजेरी लावली असली, तरी सप्टेंबर महिन्यात काहीशी दिलासादायक स्थिती आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मॉन्सून हंगामाचा हा अखेरचा महिना आहे. संपूर्ण देशातच सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

(Chance of above average rainfall in September)

Goa Monsoon Update
Goa Mining Case: लिलाव प्रक्रिया सुरू; तरीही गुप्तता का?

राज्यात २७३५.६ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना २३९०.३ मि.मी. पाऊस झाला आहे. नेहमीच्या सरासरीपेक्षा १२.६ टक्के पाऊस यंदा कमी झाला आहे. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात

पावसाचा जोर वाढेल, असे वेधशाळेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

वेधशाळेने म्हटले आहे की, ईशान्य भारतातील अनेक भाग आणि पूर्व आणि वायव्य भारतातील काही भाग वगळता भारताच्या बहुतेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशावर ''ला निना''चा प्रभाव दिसत आहे. मॉन्सून मिशन हवामान अंदाज प्रणालीनुसार ‘ला निना’चा प्रभाव वर्षअखेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. इतर हवामान मॉडेल देखील आगामी हंगामात ''ला निना'' कायम राहण्याचे देत आहे, असे वेधशाळेने म्हटले आहे.

यंदा ऑगस्ट महिन्यात एकूण 358.9 मि.मी. पावसाची नोंद झाली, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ 1 मि.मी. अधिक आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत पडलेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये 1983 साली सर्वाधिक 1,330.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर सर्वांत कमी पाऊस 1966 साली 228 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com