Canacona News: काणकोण वृक्षतोडप्रकरणी चौकशी समिती नियुक्त

उपवनसंरक्षक प्रेम कुमार : अद्याप एफओआर नोंद न केल्याचा कॉंग्रेसचा आरोप : कारवाईची मागणी
Canacona News
Canacona NewsDainik Gomantak

Canacona News काणकोणमधील वृक्षतोड व लाकूड वाहतूकप्रकरणी जनार्दन भंडारी व विकास भगत यांनी जी तक्रार नोंद केली आहे, त्याला अनुसरून काणकोणचे एसडीएफओ दामोदर सालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे.

ही समिती सर्व बाजूंनी चौकशी करत आहे. समितीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दक्षिण गोवा उपवनसंरक्षक प्रेमकुमार यांनी दिली.

कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, एल्विस गोम्स आणि कार्यकर्त्यांनी आज मडगावात उपवनसंरक्षक प्रेम कुमार यांची भेट घेतली.

सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांच्या विरोधात बेकायदेशीर वृक्षतोडप्रकरणी जी तक्रार दाखल केली आहे, त्याविषयी कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर प्रश्र्नांची सरबत्ती केली.

यावर प्रेमकुमार म्हणाले की, या चौकशीसाठी कमीत कमी आठ दिवसांचा कालावधी लागेल. चौकशी सुरू आहे.

चौकशीसाठी तक्रारदारांनाही बोलावले जाईल. त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.

Canacona News
Kadamba Buses: कदंबच्या 144 बस निघाल्या कर्नाटकला, प्रचारासाठी होणार वापर? नागरिक संतप्त

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना चोडणकर यांनी सांगितले की, भंडारी आणि भगत यांच्या तक्रारीसंदर्भात अजून एफओआर नोंद झालेला नाही. अद्याप चौकशी सुरू केलेली नाही. त्यामुळे सर्व पुरावे नष्ट करण्याची संधी आरोपीला मिळणार आहे.

हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात वन खात्यातील अधिकारी व कर्मचारीही सामील आहेत. वृक्षतोडप्रकरणी आरोपीला अटक का केली नाही, असा प्रश्‍न एल्विस गोम्स यांनी उपस्थित केला.

Canacona News
मांडवी पुलावर टेम्पो आणि दुचाकींचा अपघात, दोघे गंभीर जखमी; पुलावर वाहतूक कोंडी

वृक्षतोड कायदेशीर : प्रेम कुमार

याप्रकरणी जे पुरावे सादर केले आहेत, त्यावरून ही वृक्षतोड व लाकूड वाहतूक कायदेशीर आहे. हे लाकूड लिलावातून मिळविले आहे. अर्जदाराकडे अधिकृत वाहतूक पास आहे.

तसेच हे लाकूड अभयारण्यातील नाही. तरीसुद्धा चौकशीअंती दोषी सापडला तर कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे प्रेम कुमार यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना सांगितले.

आगीचे प्रकार खासगी वनांतील: वनांमध्ये आगीचे प्रकार सुरू आहेत, त्यासंदर्भात प्रेमकुमार म्हणाले की, ही प्रकरणे सरकारी नव्हे, तर खासगी वनांमधील आहेत.

मात्र, आग लागलेल्या ठिकाणी जायला पुरेसा रस्ता नाही. त्यामुळे आग लवकर आटोक्यात येत नाही. तरीसुद्धा ठोस उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com