Tarun Tejpal Case
Tarun Tejpal CaseDainik Gomantak

तरुण तेजपाल यांच्या प्रकरणावरील सुनावणी 30 मार्चपासून

पुन्हा तहकूब नाही, गोवा खंडपीठाने केले स्पष्ट
Published on

पणजी: तरुण तेजपाल याच्या निर्दोषत्वाला सरकारने आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पुन्हा तहकूब करताना ती 30 मार्चला ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयात तेजपाल याच्या अर्जावरील सुनावणी अजूनही झाली नसल्याने खंडपीठातील सुनावणी पुढील तारखेपासून सुरू होईल असे खंडपीठाने स्पष्ट केले. सहकारी महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून तरुण तेजपालला अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी निर्दोष ठरवले आहे.

Tarun Tejpal Case
गिरीश चोडणकरांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

त्याला सरकारने आव्हान दिले आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात तरुण तेजपाल याच्या अर्जावरील सुनावणी प्रलंबित असल्याने त्याच्या वकिलांकडून पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. आज सुनावणीवेळी याचिकादाराचे वकील हे आजारी असल्याने ती पुन्हा पुढे ढकलण्याची विनंती ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केली. राज्य सरकारतर्फे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही सुनावणी पुढे ढकलण्यास संमती दिली. त्यामुळे ती आता 30 रोजी ठेवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात तेजपाल याने आव्हान याचिकेवरील सुनावणी सीसी टीव्ही कॅमेरात घेण्याची केलेल्या विनंती अर्जावरील सुनावणी अजूनही झाली नाही. ही सुनावणी 30 मार्चपूर्वी सुरू न झाल्यास आव्हान याचिकेवरील सुनावणी सुरू केली जाईल असे दोन्ही वकिलांच्या निदर्शनास आणून दिले.

Tarun Tejpal Case
गोव्यात निवडून आलेले 30 आमदार कोट्यधीश; 13 जणांवर गुन्हे दाखल

तेजपालने राज्य सरकारच्या आव्हान याचिकेविरोधात सादर केलेल्या अर्जात ती सुनावणीस घेण्यायोग्य आहे का याबाबत तसेच सुनावणी झाल्यास ती इन कॅमेरा घ्यावी अशी विनंती केली होती. त्यातील इन कॅमेरासाठीची विनंती उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. निर्दोषत्वाला आव्हान तसेच आव्हान देण्याइतपत ती योग्य आहे का यावरील सुनावणीपुढील तारखेपासून सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com