South Goa District Hospital: दक्षिण गोवा रुग्णालयात लवकरच अत्याधुनिक यंत्रणा! राणेंची आकस्मिक भेट; कार्डिओलॉजी, न्युरोलॉजी, ऑर्थोपेडिक विभाग सुरु करणार
Health Minister Vishwajit RaneDainik Gomantak

South Goa District Hospital: दक्षिण गोवा रुग्णालयात लवकरच अत्याधुनिक यंत्रणा! राणेंची आकस्मिक भेट; कार्डिओलॉजी, न्युरोलॉजी, ऑर्थोपेडिक विभाग सुरु करणार

Health Minister Vishwajit Rane: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात येत्या ४-५ महिन्यांत कार्डिओलॉजी, न्युरॉलॉजी, ऑर्थोपेडिक तसेच रक्त तपासणी विभाग सुरू करण्यात येईल.
Published on

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात येत्या ४-५ महिन्यांत कार्डिओलॉजी, न्युरॉलॉजी, ऑर्थोपेडिक तसेच रक्त तपासणी विभाग सुरू करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मडगावात दिली. मंत्री राणे यांनी शुक्रवारी या इस्पितळाला आकस्मिक भेट दिली. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विभागांची पाहणी केली आणि डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

येथे दररोज ६०० ते ७०० रुग्ण ओपीडीत व इतर तपासणीसाठी येतात. त्यांना योग्य सुविधा पुरविण्याचा प्रयत्न असेल. रुग्णांच्या खाण्या-पिण्याची सोयसुद्धा करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या पाहणीनंतर मंत्री राणे म्हणाले की, यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. मंत्र्यांच्या या भेटीविषयी मडगावातील युवा नेते प्रभव नायक म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, जिल्हा इस्पितळात अत्यंत गरजेचे आयसीयू, ट्रॉमा युनिट, कॅथ लॅब आणि न्यूरो युनिट लवकरच कार्यान्वित केले जाईल.

South Goa District Hospital: दक्षिण गोवा रुग्णालयात लवकरच अत्याधुनिक यंत्रणा! राणेंची आकस्मिक भेट; कार्डिओलॉजी, न्युरोलॉजी, ऑर्थोपेडिक विभाग सुरु करणार
Mapusa District Hospital: शवागारातील दोन केबिनना गळती; जिल्हा रुग्णालयात लोकांची गैरसोय

- विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

दक्षिण गोव्यातील लोकांना उपचारासाठी गोमेकॉत जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या इस्पितळाला भेट देणार, असे मी विधानसभेतच सांगितले होते. त्याप्रमाणे गाजावाजा न करता मी येथे आलो आणि डॉक्टर-कर्मचाऱ्यांशी बोललो. किती डॉक्टरांची कमतरता भासते, याची माहिती जाणून घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com