Vishwajit Rane said Goa becomes Accident Capital of Country: गोवा ही देशाची अपघातांची राजधानी बनली आहे, अशी खंत गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील अपघाताचे हे वाढते प्रमाण खाली यायला हवे. रस्ते अपघातांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यामुळे गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयावर मोठा दबाव पडतो.
दरम्यान, राज्याला किमान 25 नवीन रुग्णवाहिकांची गरज आहे जेणेकरून मौल्यवान जीव वाचतील, असेही राणे यांनी म्हटले आहे.
राज्यात होत असलेल्या अपघातांच्या संख्येवर चिंता व्यक्त करताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, गोवा ही देशाची अपघाताची राजधानी बनली आहे. अनेक तरुणांचा अपघातात मृत्यू होतो आणि पालकांनी आपल्या मुलांना सावधपणे गाडी चालवण्याचा सल्ला दिला पाहिजे.
याबाबत सामाजिक भान असले पाहिजे आणि पालकांनीही जबाबदारीने वागले पाहिजे. बांबोळीतील गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMCH) वर अपघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यामुळे दबाव आहे.
ते म्हणाले, परंतु आम्हाला त्याचा सामना करावा लागतो. प्रमाणानुसार पाहिल्यास गोवा ही देशाची अपघाताची राजधानी बनली आहे. हे प्रमाण कमी झाले पाहिजे आणि रस्ते अपघातांबाबत जनजागृती करणे हे केवळ सरकारचे कर्तव्य नाही तर समाजानेही त्यात सहभागी व्हायला हवे.
राणे म्हणाले, राज्याला किमान 25 नवीन रुग्णवाहिकांची गरज आहे. रुग्णवाहिकांवर मोठा दबाव आहे. अपघात घडल्यानंतर सात मिनिटांत पोहोचायचे असल्याने काहीवेळा समस्यांना सामोरे जावे लागते.
इतर राज्यांशी तुलना केल्यास गोव्यातील रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचण्यास कमी वेळ घेतात, तरीही त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. गोवा हे एकमेव राज्य आहे ज्याने प्रगत जीवनरक्षक प्रणाली सुरू केली आहे.
ज्या भागात रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे, त्या ठिकाणांचे मॅपिंग करण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे. हेअर्स व्हॅन लोकांना सेवा देत राहतील आणि गरज पडल्यास खासगी व्हॅन्स सेवेत आणल्या जातील, असेही राणे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.